ETV Bharat / state

Ambadas Danve Criticized Kesarkar : हे सरकार कमिशनखोरांचं, दीपक केसरकर यांनी हाताखालचे काय करतात ते पाहावं - अंबादास दानवे - अंबादास दानवेंची केसरकरांवर टीका

Ambadas Danve Criticized Kesarkar : शिंदे गटाचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री (Education Minister) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी त्यांच्या हाताखालचे लोक काय ते पाहावं. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी जे सांगितलं ते चूक नाही असं अंबादास दानवे म्हणाले. (Ambadas Danve) कसा भ्रष्टाचार होणार हे माहीत असताना मंत्री उघड्या डोळ्याने सह्या करतात, असा आरोप दानवे यांनी केला. साध्या एका शिक्षकाच्या संच मान्यतेसाठी किती पैसे द्यावे लागतात ते पाहा, असं म्हणत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी टोला लगावला.

Ambadas Danve Criticizes Kesarkar
अंबादास दानवे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 7:45 PM IST

अंबादास दानवे दीपक केसरकरांच्या कारभारावर टीका करताना

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Ambadas Danve Criticized Kesarkar: शाळांच्या मान्यता देण्यासाठी पंचवीस कोटींची ऑफर आली मात्र आपण ती फेटाळली असल्याचं धक्कादायक विधान शिक्षणमंत्री केसरकर यांनी केलं. मात्र दीपक केसरकर यांनी त्यांच्या खालचे लोक काय करतात ते पाहावं, असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंत्रालयातील कामे दलाल करतात असा आरोप केला, त्यात सत्यता आहे, असं दानवे म्हणाले. आजही काही काम करायचं असंल तर दलालासाठी टेंडर काढली जातात. काम ठरलेलं असतं आणि ते करणारे देखील ठरलेले असतात. कसा भ्रष्टाचार होणार हे पहिलं जातं, माहीत असताना मंत्री उघड्या डोळ्याने पाहतात आणि सह्या करतात. साध्या एका शिक्षकाच्या संच मान्यतेसाठी किती पैसे द्यावे लागतात ते पाहा असं म्हणत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी टोला लगावला.

ओबीसी बैठकीला का नाही बोलावले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत ओबीसी समाजाच्या नेत्यांना बैठकीसाठी बोलावले होते. मात्र या बैठकीला आम्हाला बोलावले नाही. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळी सर्वपक्षीय नेत्यांना बोलावले. आता का नाही? जेंव्हा अंगावर येते तेंव्हा सर्वपक्षीय बैठक म्हणून दिखावा करतात. मराठा आरक्षण संदर्भात सर्वपक्षीयांना बोलावलं आणि आता ओबीसी आरक्षणात आम्हाला विश्वासात घेतलं नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

मराठी माणसाला घर नाकारणे चुकीचे - मुंबईत मराठी भाषिक असल्याने एका महिलेला कार्यालयासाठी जागा देण्यात आली नाही. मुलुंड सारख्या भागात मराठी माणसाला घर देण्यासाठी विरोध केला जातो हे बरोबर नाही. शिवसेना प्रमुखांच्या विचाराचे सरकार नाही. मराठी माणसाचं काहीही होवो, सरकारला फरक पडत नाही. सरकारचा वचक नाही म्हणून एखादी व्यक्ती असा विरोध करीत आहे. मराठी म्हणून नाही तर कोणत्याही समाजाला घर किंवा ऑफिस नाकारणे चुकीचे आहे. अशा प्रकरणात शिवसैनिक पुढे येऊन मदत करतील. बाळासाहेबांचा विचार संपूर्ण हिंदुस्थानने मानला आहे. भाषा, प्रांत पाहून घटना घडू नये. जर मराठी माणसाची कॉलनी असली असती आणि तिथे इतरांना विरोध केला असता तरी आम्ही तिथे विरोध केला असता. शिवसेना फक्त मराठी माणसाला नाही तर गुजराती, मारवाडी सर्वांनाच मदत करते असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं. आजच पंकजा मुंडे यांना घर नाकारल्याचं कळलं असं देखील दानवे यांनी सांगितलं.

रोहित पवार यांनी नावे जाहीर करावीत - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना नोटीस आल्या आहेत. त्यांच्या कारखान्यावर कारवाई झाली. जो सरकारला विरोध करतो त्यांना ईडी, सीबीआय चौकशीला समोरं जावं लागतं. या सगळ्या संस्था केंद्राच्या घरगडी झाल्या आहेत, अशी महाराष्ट्रातील परिस्थिती आहे. जनता उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी आहे. रोहित पवार यांनी दोन मोठे नेते कारवाई मागे सांगितले. मला माहीत नाही ते कोण, मात्र महाराष्ट्राचा विचार केला तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असू शकतात. तर केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शाह असू शकतात. माझ्या मते रोहित पवार यांनी ती नावे जाहीर करावीत, एकनाथ शिंदे स्वतः त्यात अडकलेले असल्याने त्यांचं नाव घेणार नाही अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

अनेक ठिकाणी मदत नाही - अतिवृष्टी आणि दुष्काळ याबाबत अजून शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. विमा कंपन्यांनी पैेसे देण्यास साफ नकार दिलाय. या एजन्सी सरकारला जुमानत नाहीत, सरकार सर्वसामान्यांचं आहे का नाही? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. नागपूर शहरात १० हजार घरे बुडाली, तेथे देशाचं राज्याचं नेतृत्व करणारे नेते राहतात अशा ठिकाणी अजून मदत नाही. मुंबईत पाणी तुंबलं तर कसे बोंबा मारायचे. आता तुमचं नागपूर बुडालं काही बोलत नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काही धार्मिक स्थळांवर गैरप्रकार करण्याचा कट असल्याची चिंता व्यक्त केली. त्याला आम्ही सहमत आहोत. जाणीव पूर्वक या देशात काही गोष्टी घडवल्या जाऊ शकतात असे उद्धवजींनी आधीच सांगितले आहे. विकासाचे मुद्दे बाजूला नेण्यासाठी असं होऊ शकतं, असंही ते म्हणाले.

हेही वाचा:

  1. Sameer Bhujbal On Ramesh Kadam : रमेश कदम यांचा छगन भुजबळांवरील आरोप म्हणजे स्टंटबाजी - समीर भुजबळ
  2. Raj Thackeray : मराठी महिलेला घर नाकारल्यानंतर राज ठाकरे आक्रमक; म्हणाले, गालावर वळ उठतील
  3. Sharad Pawar in Baramati : रोहित पवारांना आलेल्या नोटीसवर शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर; वाचा काय म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.