ETV Bharat / state

मुंबई वगळता एमआयएमच्या राज्यातील सर्व कार्यकारणी बरखास्त

author img

By

Published : Jan 6, 2020, 9:44 PM IST

वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याच्या प्रश्नावर गफार यांनी सकारात्मक संकेत दिले. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे ओवैसी साहेब आणि माझ्यासोबत चांगले संबंध आहेत. तसा प्रस्ताव असल्यास स्वागतच असले, अशी प्रतिक्रिया गफार कादरी यांनी दिली.

aurangabad
एमआयएम पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष  डॉ. गफार कादरी

औरंगाबाद- राज्यातील मुंबई वगळता एमआयएम पक्षाच्या सर्व कार्यकारणी बरखास्त केल्याची माहिती पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी यांनी दिली आहे. पक्षाला नव्या जोमाने उभारी देण्यासाठी पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व कार्यकारणी बरखास्त करत असल्याचे कादरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

माहिती देताना एमआयएम पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी

राज्यात पक्ष भक्कम करण्यासाठी आता दलित आणि ओबीसी समाजाला सोबत घेण्यात येणार आहे. यांच्यासह मागासवर्गीय लोकांचा समावेश करून नवी कार्यकारणी नव्या रुपात समोर आणण्यासाठी हे बदल करण्याचे ठरवले असल्याने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे डॉ. कादरी यांनी सांगितले. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्ष आणि वंचित यांची आघाडी तुटल्याने दोन्ही पक्षांना नुकसान झाले. अपेक्षित यश न मिळाल्याने संघटनात्मक बदल आवश्यक आहेत. त्यामुळे, नव्याने सुरुवात करूण पक्षाची भूमिका सर्वांपर्यंत पोहोचावी याकरिता मुंबई वगळता राज्यातील सर्व कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून डॉ. गफार कादरी यांची नेमणूक केल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. गफार कादरी यांनी पक्षातर्फे दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. दोन्ही वेळेस अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता. पक्षाने त्यांना नवीन जबाबदारी दिल्यानंतर राज्यात संघटनात्मक बदल करून पक्षाला नवे रूप देण्यसाठी मुंबई वगळता हे बदल होणार असल्याचे गफार कादरी म्हणाले. वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याच्या प्रश्नावर त्यांनी सकारात्मक संकेत दिले. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे ओवैसी साहेब आणि माझ्यासोबत चांगले संबंध आहेत. तसा प्रस्ताव असल्यास स्वागतच असले, अशी प्रतिक्रिया गफार कादरी यांनी दिली. त्यामुळे औरंगाबादच्या महानगरपालिका निवडणुकीच्या आधी वंचित आणि एमआयएम पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा- सरकारी मेडिकल कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापकाची मानसिक तणावातून आत्महत्या

Intro:एमआयएम पक्षाच्या राज्यातील मुंबई वगळता सर्व कार्यकारणी बरखास्त केल्याची माहिती पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष  डॉ गफार कादरी यांनी दिली. पक्षाला नव्या जोमाने उभारी देण्यासाठी पक्षाचे प्रमुख असोद्दिन ओवेसी यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व कार्यकारणी कार्यकारणी बरखास्त करत असल्याच कादरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. Body:राज्यात पक्ष भक्कम करण्यासाठी आता दलित आणि ओबीसी समाजाला सोबत घेण्यात येणार आहे. यांच्यासह मागासवर्गीय लोकांचा समावेश करून नवी कार्यकारणी नव्या रुपात समोर आणण्यासाठी हे बदल करण्याच ठरवल असल्याने महत्वाचा असा निर्णय घेण्यात आल्याच डॉ कादरी यांनी सांगितलं. Conclusion:राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्ष आणि वंचित यांची आघाडी तुटल्याने दोन्ही पक्षांना नुकसान झाल. अपेक्षित यश न  मिळाल्याने संघटनात्मक बदल आवश्यक आहेत त्यामुळे नव्याने सुरुवात करावी पक्षाची भूमिका सर्वांपर्यंत पोहचावी याकरिता मुंबई वगळता राज्यातील सर्व कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. राज्याचे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून डॉ गफार कादरी यांची नेमणूक केल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. गफार कादरी यांनी पक्षातर्फे दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली. दोन्ही वेळेस अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता. पक्षाने त्यांना नवीन जबाबदारी दिल्या नंतर राज्यात संघटनात्मक बदल करून पक्षाला नव रूप देण्यसाठी मुंबई वगळता हे बदल होणार असल्याच गफार कादरी म्हणाले. वंचित बहुजन आघाडी सोबत जाण्याच्या प्रश्नावर त्यांनी सकारात्मक संकेत दिले. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे आमचे अध्यक्ष ओवेसी साहेब आणि माझ्यासोबत चांगले संबंध आहेत तसा प्रशाव असल्यास  स्वागतच असले अशी प्रतिक्रिया गफार कादरी यांनी दिली. त्यामुळे औरंगाबादच्या महानगर पालिका निवडणुकीच्या आधी वंचित आणि एमआयएम [पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 
byte - डॉ गफार कादरी - प्रदेश कार्याध्यक्ष 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.