ETV Bharat / state

National Tourism Day 2022 : अजिंठा लेणी बौद्धांच्या जन्मापासून ते महानिर्वाणापर्यंतचा साकारला प्रवास - राष्ट्रीय पर्यटन दिवस अंजिठा लेणी

जगविख्यात लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेणीला ( Ajanta Caves ) एक वेगळे महत्त्व आहे. ही लेणी म्हणजे बुद्धांचा जन्मापासून ते महानिर्वाणपर्यंत प्रवास ( Buddha's Born to Death Journey ) दर्शवणारी ही लेणी मानली जाते. लेणीसोबतच काही काल्पनिक कथादेखील याठिकाणी साकरल्या गेल्या आहेत.

ajanta caves
अजिंठा लेणी
author img

By

Published : Jan 25, 2022, 3:47 PM IST

औरंगाबाद - अजिंठा लेणी ( Ajanta Caves ) म्हणलं तर एक वेगळी शिल्प आपल्या नजरेसमोर उभा राहतो. जगविख्यात लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अजिंठा लेणीला एक वेगळे महत्त्व आहे. ही लेणी म्हणजे बुद्धांचा जन्मापासून ते महानिर्वाणपर्यंत प्रवास ( Buddha's Born to Death Journey ) दर्शवणारी ही लेणी मानली जाते. लेणीसोबतच काही काल्पनिक कथादेखील याठिकाणी साकरल्या गेल्या आहेत. राष्ट्रीय पर्यटन दिनाच्या निमित्ताने ( National Tourism Day 2022 ) ईटीव्ही भारतने अंजिठा लेणीचा घेतलेला हा विशेष आढावा. ( ETB Bharat Ajanta Caves Special Report )

इतिहासतज्ञ डॉ. संजय पाईकराव याबाबत बोलताना

गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित आहेत 30 लेण्या -

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी वाकाटक, गुप्त आणि सातवाहन कालखंडातील आहे. इसवी सन दुसरे शतक ते सातवे शतक या काळात लेण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. परिसरात तीस लेणी असून पूर्ण लेण्या बुद्ध लेण्या आहेत. लेणी क्रमांक 1, 2, 16 आणि 17 बुद्धाच्या जीवनातील जातक कथा चित्रित करण्यात आल्या आहेत. या लेण्यांचे वैशिष्ट्य जर पाहिले तर बुद्धांच्या जन्माच्या आधीपासूनच्या कथा यात रेखाटण्यात आणि चित्रित करण्यात आल्या आहेत. बौद्ध धर्माच्या आधारावर या सर्व कलाकृती आहेत. बुद्धांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणा पर्यंतचा प्रवास या लेण्यांमध्ये अनुभवायला मिळतो. अतिशय कोरीव आणि रेखीव अशा कलाकृती या लेण्यांमध्ये साकारण्यात आल्या आहेत, अशी माहिती इतिहास तज्ञ डॉ. संजय पाईकराव यांनी दिली.

अठराशे 1819 मध्ये लेण्या आल्या जगा समोर -

या लेण्यांची निर्मिती दुसऱ्या आणि सातव्या शतकाच्या काळात झाली असली, तरी या लेण्या जगासमोर इसवी सन 1819मध्ये आल्या. मद्रास रेजिमेंटचे सैन्यातील अधिकारी जॉन स्मिथ शिकारीसाठी अजिंठा परिसरात आले होते. त्यांना वाघाची शिकार करायची होती. एक वाघ त्यांना दिसला आणि त्यांनी त्याला गोळी मारली. मात्र, गोळीचा आवाज आला नाही. त्यामुळे उत्सुकतेपोटी त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेस त्यांना पहिल्यांदा अजिंठा लेणी दिसून अली. त्यानंतर या लेण्यांवर त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि परिसर स्वच्छ करत गेले. तर अशा एकेक लेण्यासमोर आल्या आणि जवळपास तीस लेण्या या परिसरात आढळून आल्या. त्यानंतर तेथे स्वच्छता केल्यानंतर या लेण्या जगासमोर आल्या आणि तेव्हापासून आजपर्यंत अजिंठाचे आकर्षण कायम आहे, अशी माहिती इतिहास तज्ञ डॉ. संजय पाईकराव यांनी दिली.

हेही वाचा - National Tourism Day 2022 : जगात एकमेव असणारी वेरूळ लेणी घडवते तीन धर्मांचे दर्शन

बुद्धांवर सर्वोत्तम कलाकृती चे प्रतीक अजिंठा -

अजिंठा लेणी बौद्ध धर्माच्या आधारावर आधारित लेणी मानली जाते. जगात सर्वोत्तम चित्रकला कृती प्रतीक याठिकाणी असल्याचं बोललं जातं. पहिल्यांदाच चित्रांमध्ये नैसर्गिक रंगांचा वापर करत रंगकाम आणि चित्र काम केल्याचा या ठिकाणी दिसून आलं. एकूणच तीस कथांचे चित्रण या भागात करण्यात आल आहे. एका ठिकाणी 246 फूट असलेल्या दगडावर बुद्धांच्या जन्मापासून ते महानिर्वाण पर्यंतचा प्रवास लेणीमध्ये साकारण्यात आला आहे. या ठिकाणी साकारण्यात आलेल्या कथांमध्ये प्राणी, चिनी, जैन, ब्राह्मण लोकांचे चित्रण या ठिकाणी करण्यात आले आहे, अशी माहिती इतिहास तज्ञ डॉ संजय पाईकराव यांनी दिली.

शापित लेणी अशी होती ओळख -

लेण्यांमध्ये साकारण्यात आलेले चित्र कालांतराने खराब होण्यास सुरुवात झाली. अनेक इंग्रज अधिकारी लेणी पाहण्यासाठी परिसरात येत होते. आतमध्ये अंधुक प्रकाशात चित्र दिसत नव्हती. त्यामुळे आग लावून ती चित्र पाहण्याचा प्रयत्न केला जात होता. त्या आगीमुळे अनेक चित्र खराब झाले होते. मात्र, त्यांच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. देश-विदेशातून अनेक चित्रकार आणि शास्त्रज्ञ चित्रांचे संवर्धनासाठी लेणी परिसरात येत होते. त्यावेळी या लेण्यांचं चित्रीकरण करण्यात आलं. जवळपास चार वेळा हे चित्रीकरण त्या काळात करण्यात आलं. मात्र, हे चित्र जगासमोर येण्याआधीच काहीतरी आपत्ती यायची आणि काढण्यात आलेले चित्र नष्ट व्हायचे. त्यामुळे या लेण्या शापित असल्याचं त्या काळी बोललं जायचं, अशी माहितीही इतिहास तज्ञ डॉ संजय पाईकराव यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.