ETV Bharat / state

उपभियंत्याला मारहाण करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर अदखलपात्र गुन्हा

औरंगाबादच्या सिडको-हडको भागात ९ दिवसानंतरही पाणी न मिळाल्याने शनिवारी भाजपच्या नगरसेविका माधुरी अदवंत, नगरसेवक शिवाजी दांडगे यांसह एन-5 जलकुंभ गाठत आंदोलन केले.

author img

By

Published : May 27, 2019, 8:33 AM IST

घटनास्थळवरील छायाचित्र

औरंगाबाद - औरंगाबादच्या सिडको-हडको भागात ९ दिवसानंतरही पाणी न मिळाल्याने शनिवारी भाजपच्या नगरसेविका माधुरी अदवंत, नगरसेवक शिवाजी दांडगे यांसह एन-5 जलकुंभ गाठत आंदोलन केले. यावेळी उपअभियंता के. एम. फालक यांना शिवीगाळ आणि मारहाण केली होती. या प्रकरणी सिडको पोलीस ठण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

घटनास्थळवरील दृश्ये

गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील पाणीप्रश्न पेटला असून सिडको-हडको परिसरात पाणी टंचाई तीव्र झाली आहे. शहरातील काही जुन्या वसाहती, सिडको-हडको परिसरात सहा ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, शनिवारी एन-4 परिसरात नऊ दिवसानंतरही प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. यामुळे त्या भागाच्या नगरसेविका माधुरी अदवंत यांनी सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांसह थेट एन-5 जलकुंभ गाठत आंदोलन सुरू केले. यावेळी भाजप आमदार अतुल सावे, नगरसेवक शिवाजी दांडगे यांचीही उपस्थिती होती. पुंडलिक नगर येथील पाणी टाकीवरून एन-3, एन-4, परिसराला वाहिनी जोडून पाणी देण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली. दुपारी पालिका आयुक्त निपुण विनायक दाखल झाल्यानंतर त्यांनी यासंबंधी लेखी आश्वासन आंदोलकांना दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

जलकुंभावर आंदोलन सुरू असल्याने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता के. एम. फालक, अशोक पदमे आदी जलकुंभावर दाखल झाले. यावेळी आक्रमक असलेल्या नागरिकांनी फालक यांना बुक्का मारत शिवीगाळ केल्याचाही प्रकार घडला. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अदाखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यासह टँकर संबंधी अनेक तक्रारी यावेळी आयुक्तांच्या निदर्शनाला आल्याने पर्यवेक्षक उदवंत खेडकर यांना निलंबित करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले.

Intro:9 दिवसानंतरही पाणी न मिळाल्याने शनिवारी भाजपच्या नगरसेविका माधुरी अदवंत, नगरसेवक शिवाजी दांडगे यांनी नागरिकांसह एन-5 जलकुंभ गाठत आंदोलन करीत उपअभियंता के एम फालक यांना शिवीगाळ आणि मारहाण केली होती या प्रकरणी सिडको पोलिस ठण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Body:गेल्या दोन महिन्यापासून शहरातील पाणीप्रश्न पेटला असून सिडको-हडको परिसरात पाणी टंचाई त्रिव झाली आहे. शहरातील काही जुन्या वसाहती, सिडको हडको परिसरात सहा ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान शनिवारी एन-4 परिसरात नऊ दिवसानंतर प्रशासनाच्यावतीने पाणीपुरवठा करण्यात आलेला नसल्याने त्या भागाच्या नगरसेविका माधुरी अदवंत यांनी सकाळी सात वाजेपासून नागरिकांसह थेट एन-5 जलकुंभ गाठत आंदोलन सुरू केले. यावेळी भाजप आमदार अतुल सावे, नगरसेवक शिवाजी दांडगे यांचीही उपस्थिती होती. पुंडलिक नगर येथील पाणी टाकी वरून एन-3, एन-4, परिसराला वाहिनी जोडून पाणी देण्याचे काम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली. दुपारी मनपा आयुक्त निपुण विनायक दाखल झाल्यानंतर त्यांनी यासंबंधी लेखी आश्वासन आंदोलकांना दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान जलकुंभावर आंदोलन सुरू असल्याने पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, उपअभियंता के एम फालक, अशोक पदमे आदी जलकुंभावर दाखल झाले. यावेळी आक्रमक असलेल्या नागरिकांनी फालक यांना बुक्का मारत शिवीगाळ केल्याचाही प्रकार घडला. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अदाखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यासह टँकर संबंधी अनेक तक्रारी या वेळी आयुक्तांच्या निदर्शनाला आल्याने सुपरवायझर उदवंत खेडकर यांना निलंबित करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.