ETV Bharat / state

प्रेमविवाहानंतर नवदाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पत्नीचा मृत्यू - वैजापूरमध्ये प्रेमविवाहानंतर आत्महत्या

प्रेमविवाह करून नवदाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पत्नीचा मृत्यू झाला. पतीवर उपचार सुरू आहेत. या घटनेपूर्वी वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसात केली होती. या नवदाम्पत्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस तपास करत आहेत.

vaijapur
vaijapur
author img

By

Published : Mar 21, 2021, 10:03 AM IST

वैजापूर (औरंगाबाद) : प्रेमविवाह केलेल्या नवदाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शहरापासून जवळच गंगापूर चौफुली येथे उघडकिस आली आहे. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर, पतीला उपचारासाठी औरंगाबाद मधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्याणी सोमेश गायकवाड (वय २१. रा. वाकला) असे मृत महिलेचे नाव आहे.

प्रेमविवाहानंतर फाशी -
या घटनेबाबत अधिक माहिती अशी, की वैजापूर तालुक्यातील वाकला येथील रविंद्र आखाडे यांची मुलगी कल्याणी ही ११ जानेवारी रोजी घरातून निघून गेली होती. त्यानंतर शिऊर पोलीस ठाण्यात रविंद्र यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद केली. या दरम्यान, कल्याणी हिने सोमेश गायकवाड याच्याशी प्रेमविवाह केला. नंतर कल्याणी व सोमेश या दोघांनीही गंगापूर चौफुली येथे एका झाडाला ओढणी व दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत दोर तुटल्याने सोमेश बचावला. मात्र, कल्याणीचा मृत्यु झाला.

प्रेमविवाहानंतर फाशी, कारण अस्पष्ट -

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक सम्राट राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक आरती जाधव, पोलीस नाईक लक्ष्मण गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. नंतर सोमेशला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव या करीत आहेत. दरम्यान, प्रेमविवाह करणाऱ्या या नवदाम्पत्याने हे टोकाचे पाऊल का उचलले? यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.