ETV Bharat / state

तिहेरी तलाकऐवजी लग्न करूनही न नांदविणाऱ्यावरोधात कायदा करा; अॅड. आंबेडकरांचा मोदींना टोला

तिहेरी तलाक बाबत कायदा केला जात आहे. मात्र, इतर समाजातील स्त्रियांसंदर्भात भाजप सरकारने काय केले, असा सवाल अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

अॅड. प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Jul 28, 2019, 11:52 PM IST

औरंगाबाद - 'तिहेरी तलाक बाबत कायदा केला जात आहे. मात्र, इतर समाजातील स्त्रियांसंदर्भात भाजप सरकारने काय केले. पंतप्रधानांनी लग्न केले. मात्र, नांदवले नाही त्याबद्दल काय,' असा प्रश्न देखील अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. मुस्लिमांबाबत तिहेरी तलाकचा कायदा करण्याऐवजी लग्न करूनही न नांदविणाऱ्याविरोधात कायदा आणणे गरजेची आहे, असे म्हणत अॅड. आंबेडकरांनी मोदींवर टोला लगाविला.

तिहेरी तलाकऐवजी लग्न करूनही न नांदविणाऱ्यावरोधात कायदा करा; अॅड. आंबेडकरांचा मोदींना टोला

औरंगाबादमध्ये बंजारा समाजाने मेळावा घेऊन आपला पाठिंबा वंचित बहुजन आघाडीला जाहीर केला. यावेळी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रमुख भाषण केले. 'मोदी जिथे जिथे राष्ट्रभक्ती दाखवतात, तो केवळ देखावा आहे. पाकिस्तान कंगाल झाला आहे. पंतप्रधान म्हणाले होते, पाकिस्तानला संपवू. तर संपवा ना कोणी थांबवले आहे. गल्लीत झालेल्या भांडणात हुल देतात तशी हुल मोदी देत आहेत. अशा थापेबाजांना थांबवण्याचे काम वंचितला करायचे आहे,' असेही ते पुढे म्हणाले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.