ETV Bharat / state

कन्नड तालुक्यातील १६ कॉपी बहाद्दरांवर कारवाई, प्राचार्यांसह शिक्षकांवर गुन्हा दाखल

परीक्षा सुरू असताना भरारी पथकाला या केंद्रावर दोन ते तीन अज्ञात व्यक्ती ओळखपत्राशिवाय आढळून आल्या. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात १४४ कलम लागू असताना हे अज्ञात व्यक्ती विद्यालयाच्या वर्गात काय करीत होते? याबाबतचा खुलासा मागविण्यात आला आहे.

copy
नागदमध्ये १६ कॉपी बहाद्दरांवर कारवाई, प्राचार्यांसह शिक्षकांवर गुन्हा दाखल
author img

By

Published : Feb 29, 2020, 3:02 PM IST

औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील नागद येथे बारावी परीक्षेत कॉपीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी दोन या वेळेत गणित विषयाची परीक्षा पार पडली. त्यात नागद येथील राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालय या परीक्षा केंद्रांवर कॉपी करताना १६ विद्यार्थ्यांना पकडण्यात आले. त्यांच्यावर शिक्षण अधिकारी बी. बी. चव्हाण यांचा पथकाने कॉपी प्रतिबंधक कारवाई केली.

शिक्षक आणि प्राचार्यांवरही मुंबई पोलीस कायदा कलम 37(1,3) प्रमाणे 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरारी पथक महाविद्यालयात असताना प्राचार्य ताराचंद नेमीचंद बिंदवाल, शिक्षक शेखर जगदिश पाटील, रवींद्र बाळासाहेब निकम हेही महाविद्यालयातच होते. याप्रकरणी केंद्र प्रमुखांनी कन्नड पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारींतर गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा - VIDEO: अहमदाबाद- जयपूर विमानात शिरलं कबूतर; प्रवाशांची उडाली धांदल

परीक्षा सुरू असताना भरारी पथकाला या केंद्रावर दोन ते तीन अज्ञात व्यक्ती ओळखपत्राशिवाय आढळून आल्या. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात १४४ कलम लागू असताना हे अज्ञात व्यक्ती विद्यालयाच्या वर्गात काय करीत होते? याबाबतचा खुलासा मागविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भिवसने हे तपास करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.