ETV Bharat / state

औरंगाबादेत पुन्हा पीडितेवर बलात्कार, जामिनावर सुटून आलेल्या आरोपीचे कृत्य - sagar suni shreesundar aurangabad

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याच मुलीवर बलात्कार केला आहे. सागर सुनील श्रीसुंदर (रा.शांतीपुरा,छावणी) असे आरोपीचे नाव आहे.

जामिनावर सुटून आलेल्या आरोपीचा पुन्हा 'त्याच' अल्पवयीन मुलीवर बलात्कार
author img

By

Published : Oct 11, 2019, 3:43 PM IST

Updated : Oct 11, 2019, 5:23 PM IST

औरंगाबाद - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा त्याच मुलीवर बलात्कार केला आहे. सागर सुनील श्रीसुंदर (रा.शांतीपुरा,छावणी) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या नराधमाविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छावणीतील शांतीपुरा भागात राहणारी 16 वर्षीय पीडीत मुलगी दररोज सायंकाळी परिसरातील एका प्रार्थना स्थळी जात असते. मुलगी प्रार्थना करून घराकडे जात असताना आरोपीने तिला रस्त्यात अडविले. त्याने पीडीतेला मारहाण करून सोबत आणलेल्या रिक्षात बसवले. 'माझ्यावर केस का केली', अशी विचारना करत आरोपी तीला छावणीतील स्मशानभुमीकडे घेऊन गेला. त्यांना तिथे सोडून रिक्षावाला निघून गेल्यानंतर त्याने पीडीतेवर बलात्कार केला.

हेही वाचा - धक्कादायक.. चिमुरडीसमोरच विवाहितेवर सामूहिक बलात्कार, दिले सिगरेटचे चटके व विष पाजून फेकले रस्त्यावर

पीडीतेने रात्री दहा वाजता आरोपीच्या तावडीतुन सुटका करून घेत घर गाठले आणि घडलेला प्रकार आई व मावशीला सांगितला. त्यानंतर 7 ऑक्टोबरला छावणी पोलीस ठाण्यात आरोपी सागर श्रीसुंदर विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी, पोलीस निरीक्षक मनोज पगारे अधिक तपास करत आहे

Intro:
प्रार्थना करून घराकडे जात असलेल्या अल्पवयीन मुलीचे रिक्षातून अपहरण करून बलात्कार करणाऱ्या नराधमाला विरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला धक्कादायक म्हणजे या मुलीवर पूर्वी बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात आरोपी जामिनावर सुटून आला होता.बाहेर येताच त्याने केस का केली असे म्हणत पुन्हा तिच्यावर बलात्कार केला.सागर सुनील श्रीसुंदर (रा.शांतीपुरा,छावणी) असे आरोपीचे नाव आहे.

Body:छावणीतील शांतीपुरा भागात राहणारी 16 वर्षीय तरुणी परिसरातील शाळेत दहावीत शिकते ती दररोज सायंकाळी परिसरातील एका प्रार्थना स्थळी जात असते नेहमी प्रमाणे ती सहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता प्रार्थना करून घराकडे पायी येत होती तेव्हा सागरने तिला रस्त्यात अडविले व मारहाण करून सोबत आणलेल्या रिक्षात बळजबरी बसविले तू माझ्यावर केस केली असे म्हणत त्याने रिक्षा तही तिला मारहाण केली तरुणीचे तोंड दाबून छावणीतील कब्रस्तान कडे रिक्षा नेण्यास रिक्षाचालकाला सांगितले तिथे रिक्षावाला सोडून निघून गेल्यानंतर त्याने तरुणीस मोकळ्या जागेत नेले तेथे पुन्हा मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली व तरुणीचे दोन्ही हात बांधून बलात्कार केला
तरुणीने गयावया करून कशीबशी रात्री दहा वाजता त्याच्या तावडीतुन सुटका करून घर गाठले व घडलेला प्रकार आई व मावशीला सांगितला या घटनेनंतर तरुणीने 7 ऑक्टोबर रोजी छावणी पोलिस ठाण्यात सागर श्री सुंदर विरुद्ध तक्रार दिली याप्रकरणी पोलीस निरीक्षक मनोज पगारे अधिक तपास करीत आहेConclusion:
Last Updated : Oct 11, 2019, 5:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.