छत्रपती संभाजीनगर : तेलंगाणातील गावात काकाच्या अंत्यविधीवरुन परत सूरतला जाणाऱ्या चार भावंडाच्या गाडीला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात चार भावंडांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना बुधवार २४ रोजी पहाटे तीन वाजता करमाड- शेकटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर घडली. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, संजय रजणभाई गौड ( वय ४३ ) कृष्णा राजणभाई गौड ( वय ४४) , श्रीनिवास रामू गौड ( वय ३८ ) , सुरेशभाई गौड वय ( ४१ रा. सर्व लेफ सिटी करडवा सुरत गुजरात ) असे अपघातात ठार झालेल्या चार भावंडांची नावे आहेत. गौड कुटुंबीय सूरत येथे कपड्यांचा व्यवसाय करत होते. दरम्यान गौड कुटुंबातील एका व्यक्तीचा तेलंगाना येथे मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यविधीसाठी ते तेलंगाणांत गेले होते. मात्र परत जाताना ही अपघात झाला.
डुलकी लागल्याने अपघात झाला : काकांच्या अंत्यविधीसाठी चारही भावंडे इर्टिका या चारचाकी वाहनाने अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून चारही भावंडे सुरतकडे परत निघाले होते. दरम्यान करमाड - शेकटा येथील समृद्धी महामार्गावर गौड कुटुंबियांच्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटले. डुलकी लागल्याने गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यावेळी भरधाव वेगात असलेली चारचाकी दुभाजकावर धडकली. भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. गाडीत मागे बसलेला मुलगा अपघातात बचावला आहे. दरम्यान या प्रकरणी करमाड पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
भावंडे अंत्यसंस्कारासाठी आले होते : महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे एका कार अपघातात तेलंगणातील चार रहिवाशांचा मृत्यू झाला. सिद्धीपेट जिल्ह्यातील चौतापल्ली येथील एरुकुला कृष्णा, संजीव, सुरेश आणि वासू अशी या चार भावांची ओळख पटली आहे. पोलिसांनी सांगितले की, ते नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी सूरतला परतत असताना हा अपघात झाला. हे चारही भाऊ काही वर्षांपूर्वी गुजरातमधील सूरत येथे राहण्यासाठी गेले होते. पाच दिवसांपूर्वी त्यांचे नातेवाईक एरुकला रामुलू यांचे त्यांच्या मूळ गावी चौतापल्ली येथे निधन झाले. त्यामुळे हे चौघेही त्यांच्या कुटुंबीयांसह चौतापल्ली येथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते.
हेही वाचा : 1. Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी नैराश्यातून; नांदेडच्या तरुणाला एटीएसकडून अटक
2. Arvind Kejriwal Mumbai Visit : अरविंद केजरीवाल, भगवंत मान उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल