औरंगाबाद : औरंगाबाद नगर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मायलेकाचा मृत्यू झाला (Accident On Aurangabad Nagar Highway) आहे. दोन गंभीर जखमी (mother and son died and two injured) आहेत. औरंगाबाद नगर महामार्गावर इसारवाडी फाट्याजवळ सकाळी सहा वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला असून अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मायलेकाचा जागेवरच मृत्यू : एसटी बस आणि बैलगाडीचा हा अपघात झाला असून, ज्यात बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातात कलियाबाई गोविंद गिरे,अर्जुन गोविंद गिरे या ऊसतोड कामगार मायलेकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर गोविंद विठ्ठल गिरे, बाळू गोविंद गिरे हे गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. भीषण अपघातात ऊसतोड कामगाराचे दोन बैल ही गंभीर जखमी झाले (accident son died and two injured) आहे.
एसटी बस बैलगाडीचा भीषण अपघात : अहमदनगर महामार्गावरील (Aurangabad Nagar highway) इसारवाडी फाट्याच्याजवळ असलेल्या इंडियन हॉटेलजवळ गंगापूर आगाराच्या बसने ऊस तोडीला जाणाऱ्या बैलगाडीला जोराची धडक दिली. बसचा वेग अधिक असल्याने बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. तर या अपघातात बैलगाडीत बसलेल्या कलियाबाई गोविंद गिरे, अर्जुन गोविंद गिरे जागीच मृत्यू झाला आहे. तसेच बैलगाडी चालवत असलेले मृत महिलेचे पती गोविंद विठ्ठल गिरे, बाळू गोविंद गिरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव करत जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात हलवले (accident on mother and son died) आहे.