ETV Bharat / state

औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तारांनी पक्ष सोडताच काँग्रेस भवनला दिलेल्या ३०० खुर्च्या नेल्या परत - औरंगाबाद

काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी शहागंज येथील काँग्रेस भवनला दिलेल्या खुर्च्या परत नेल्याची घटना समोर आली आहे. रविवारी अब्दुल सत्तार यांचे स्वीय सहाय्यक यांनी या खुर्च्या परत नेल्या आहेत.

काँग्रेस भवन
author img

By

Published : Mar 26, 2019, 3:34 PM IST

Updated : Mar 26, 2019, 5:26 PM IST

औरंगाबाद- काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी शहागंज येथील काँग्रेस भवनला दिलेल्या खुर्च्या परत नेल्याची घटना समोर आली आहे. रविवारी अब्दुल सत्तार यांचे स्वीय सहाय्यक यांनी या खुर्च्या परत नेल्या आहेत. २००८ मध्ये अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस भवनला ३०० खुर्च्या दिल्या होत्या.

अब्दुल सत्तार यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या खुर्च्या या परत नेल्याने ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेस भवनचा भव्य हॉल रिकामा पडला आहे. त्यामुळे काँग्रेसला आपल्या कार्यकर्त्यांची बैठक ही राष्ट्रवादी भवनमध्ये घेण्याची वेळ आली आहे. काँग्रेसतर्फे आमदार सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली. या घोषणेनंतरकाँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी बंडाचा झेंडा उगारत, अपक्ष उमेदवारी जाहीर केली. इतकच नाही तर त्यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याची घोषणा देखील त्यांनी केली.

रविवारी अचानक अब्दुल सत्तार यांच्या स्वीय सहाय्यकाने सत्तार यांनी दिलेल्या ३०० खुर्च्या परत नेल्या.सत्तार यांच्या या कृत्याने निश्चितच काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. नगराध्यक्ष, आमदार असे अनेक पद काँग्रेसमुळेभूषवणाऱ्या सत्तार यांनी असे करावे का असा प्रश्न काँग्रेसच्या गोटातून उपस्थित केला जात आहे.

मोजो मोबाईल हँग झाल्याने स्क्रिप्ट मेल करत आहे.

Feed send from mojo
Slug - mh_aur_1_26mar_sattar_chier

काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस भवन ला दिलेल्या खुर्च्या परत नेल्याची घटना समोर आली आहे. रविवारी अब्दुल सत्तार यांचे स्वीय सहाय्यक यांनी या खुर्च्या परत नेल्या आहेत. 2008 मध्ये अब्दुल सत्तार यांनी 300 खुर्च्या काँग्रेस भवन ला दिल्या होत्या. मात्र अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी दिलेल्या खुर्च्या या परत नेल्या त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेस भवन चा भव्य हॉल रिकामा पडला आहे. त्यामुळे काँग्रेसला आपल्या कार्यकर्त्यांची बैठक ही राष्ट्रवादी भवनमध्ये घेण्याची वेळ आली आहे. काँग्रेसतर्फे आमदार सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली. या घोषणेनंतर काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी बंडाचा झेंडा उगारत, अपक्ष उमेदवारी जाहीर केली. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याची घोषणा देखील त्यांनी केली. त्यानंतर रविवारी अचानक अब्दुल सत्तार यांच्या स्वीय-सहाय्याने सत्तार यांनी 2008 मध्ये दिलेल्या 300 खुर्च्या परत नेल्या. सत्तार यांच्या या कृत्याने निश्चितच काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. नगराध्यक्ष आमदार असे अनेक पदर काँग्रेस मुळे भूषणाऱ्या सत्तार यांनी असं करावं का असा प्रश्न काँग्रेसच्या गोटातून उपस्थित केला जातोय. शहागंज येथील काँग्रेस भवन चा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.

Amit phutane 
Aurangabad

Last Updated : Mar 26, 2019, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.