औरंगाबाद - महिलेच्या छेडछाडीच्या तक्रारी आपण पहिल्या आहेत. या तक्रारींमध्ये तो मला त्रास देतोय, तो मला छळतोय, त्यामुळे माझा शाररिक आणि मानसिक त्रास होतोय असे नमूद केलेले असते. मात्र, औरंगाबादच्या फुलंब्री पोलिसात एका महिलेने अशीच एक तक्रार केली आहे. मात्र ही तक्रार कोणत्या पुरुषाविरुद्ध नाही तर रस्त्याविरोधात केली आहे.
14 वर्षांपासून प्रवास करणाऱ्या महिलेची तक्रार -
औरंगाबाद शहरात राहणाऱ्या संध्या घोळवे-मुंडे या फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करतात. गेल्या 14 वर्षांपासून रोज औरंगाबाद ते फुलंब्री असा प्रवास करतात, गेल्या काही वर्षांपासून रस्त्याचे चौपदरी करत आणि नवीन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र संथ गतीने काम सुरू असल्याने त्यांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. नेमकी तक्रार कशी करावी, या बाबत संभ्रम असल्याने संध्या यांनी थेट पोलीस स्टेशनलाच तक्रार दिली. तसेच रस्त्यामुळे आपला छळ होत असल्याचे तक्रारीत नमूद केले.
रस्त्याबाबत लेखी तक्रार -
संध्या घोळवे - मुंडे यांनी पोलिसांत तक्रार देत असताना हा रस्ता मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास व्हावा या हेतूने धक्का बुक्की व अडवणूक करीत आहे, तो सुधारेल अशी मला अशा होती. मात्र, तसे न होता हा रस्ता दिवसोदिवस प्राणघातक बनत चालला आहे. त्यामुळे माझ्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. रस्त्यामुळे अनेक प्रकारच्या वेदना रोज सहन कराव्या लागत आहे. आमच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी हा मार्ग निवडला, प्रशासनाने या बाबत संबंधितांवर कारवाई केली नाही. तर न्यायालयात दाद मागणार असल्याच संध्या घोळवे-मुंडे यांनी सांगितले.
अजिंठा लेणी पर्यटक लेणीमुळे घटले -
औरंगाबाद - जळगाव महामार्गाचे काम गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. याच रस्त्यावर 110 कोलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहे. रस्त्याचे काम करत असताना त्याचे योग्य नियोजन केले गेले नाही. त्यामुळे दोन - अडीच तासांमध्ये कापणारा रस्ता पाच तास लागायचे तिथे पाच तास लागायचे. याचा परिणाम पर्यटकांवर झाला होता. अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटक संख्येत घट झाली होती. हा रस्ता लवकर करावा, यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी पाठपुरावा देखील केला होता. मात्र संबंधित विभाग त्याला दाद देत नव्हता अशी तक्रार व्यावसायिकांनी राज्य सरकारकडे केली होती.
हेही वाचा - लालबाग साराभाई इमारतीला लागलेल्या आगीत एका महिलेचा मृत्यू; 9 जणांची प्रकृती गंभीर