ETV Bharat / state

Minor Girl Rape : अल्पवयीन युवतीवर 50 वेळा सामूहिक अत्याचार, औरंगाबादच्या बलात्कार प्रकरणात नवीन खुलासा

सातारा परिसरातील अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पीडित मुलीने आपल्यावर आतापर्यंत वेगवेगळ्या वेळी 45 ते 50 पेक्षा अधिक वेळा अत्याचार झाल्याचा जबाब पोलिसांना दिला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यात अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

Minor Girl Rape
Minor Girl Rape
author img

By

Published : Jun 14, 2023, 3:54 PM IST

Updated : Jun 14, 2023, 5:01 PM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : सातारा परिसरात अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी खळबळ उडाली आहे. युवतीवर तिच्याच ओळखीच्या मुलांनी आपल्या मित्रांसोबत वेगवेगळ्या वेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मुलीने दिलेल्या तक्रारी नुसार ओळखीच्या सहा जणांनी धमकी देत वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन सामूहिक अत्याचार केला.

पाच आरोपींना अटक : मागील वर्षी ऑक्टोबर ते एप्रिल या काळात कधी दोघांनी तर कधी तिघांनी अत्याचार केले. त्रास सहन न झाल्याने अखेर तिने कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनीही सुरुवातीला अविश्वास दाखवला, मात्र नंतर वडिलांनी पुढे येत तक्रार दिली. सातारा पोलिसात गुन्हा दाखल करत पाच आरोपींना अटक केली. यात दोन आरोपी अल्पवयीन असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

धमकी देत केला अत्याचार : चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित असलेल्या मुलांनी अत्याचार केले. तिला एकेदिवशी मध्यरात्री घराबाहेर बोलवत त्यांनी तिला धमकी देत तिचे अश्लील व्हिडिओ काढले. त्याचाच गैरफायदा घेत त्यांनी तिच्यावर नंतर वेगवेगळ्या मुलांना सोबत घेत अत्याचार केले. कोणाला काही सांगितलं तर बदनामी करण्याची धमकी देत अत्याचार केले.

45 ते 50 वेळा अत्याचार : पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात 45 ते 50 वेळा अत्याचार केल्याची माहिती दिली. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. तर एक जण अद्याप फरार आहे. या प्रकरणी सज्ञान आरोपींना 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर दोन अल्पवयीन आरोपींना सुधार गृहात पाठवण्यात आले आहे.

ब्लॅकमेल करून वारंवार छळ : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीचा अक्षय चव्हाण नावाच्या ओळखीच्या व्यक्तीने सुरुवातीला विनयभंग केला. छेडछाडीचा व्हिडिओही बनवला होता. नंतर तोच व्हिडिओ दाखवून पीडित मुलीला ब्लॅकमेल करण्यात आले. धक्कादायक म्हणजे या पाशवी कृत्यात त्याच्या इतर सहा ते सात मित्रांचा सहभाग होता. या आरोपींनी मुलीवर वारंवार अत्याचार केले. तसेच तिने नकार दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या सततच्या अत्याचाराला कंटाळून तरुणीने पळून जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने रेल्वे स्टेशनही गाठले. मात्र तिला एकटी पाहून पोलिसांना तिच्या हालचालींवर संशय आला आणि संपूर्ण घटना उघडकीस आली.

आरोपीच्या मित्रांनीही केला तरुणीवर अत्याचार : पीडित अल्पवयीन मुलगी सध्या नववीच्या वर्गात शिकत आहे. 2022 मध्ये ती तीच्या मित्राच्या संपर्कात आली होती. मोबाईल नंबरची देवाणघेवाण केल्यानंतर त्यांचे व्हॉट्सअपवर नियमित बोलणे सुरू झाले. मात्र, त्यानंतर हा तरुण तिला भेटण्याचा हट्ट करू लागला. तिचा विश्वास जिंकून त्याने तिला भेटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा त्याने तिला भेटण्यासाठी बोलावून शिवीगाळ केली. चोरीच्या मोबाईलवर या अत्याचाराचे चित्रीकरणही करण्यात आले. नंतर तोच व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करून तिच्यावर अत्याचार केला. त्याने मित्रांनाही मुलीवर अत्याचार करण्यास मदत केली.

हेही वाचा - Nanded Crime News : पोलीस भरतीत बनावट प्रमाणपत्र सादर केले, 11 जणांवर गुन्हा दाखल

Last Updated : Jun 14, 2023, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.