औरंगाबाद - तक्षशिलानगर येथील रहिवासी रिजवाना बेगम यांना त्यांच्या जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम करायचे होते. हे काम करण्यासाठी त्यांनी शेख फरहान यांना बोलावले होते. कामाचे स्वरूप पाहण्यासाठी सकाळी फरहान हा मजूर बेगम यांच्या निवासस्थानी गेला. यावेळी घराच्या पायऱ्या चढत असताना अचानक पाय घसरून पडला. यावेळी खाली असलेली उघडी सळई फरहानच्या पोटात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. यात गंभीर जखमी झाल्याने तो मरण पावला. ही घटना सोमवारी ७ जून रोजी सकाळी १० वाजता तक्षशिलानगर येथे घडली. या प्रकरणी जिंसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
उघडी सळई पोटात घुसल्याने मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिजवाना बेगम यांच्या जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम करायचे होते. शेख फरहान ( वय ३०) हे काम पाहण्यासाठी सोमवारी बोलावले होते. कामाचे स्वरूप पाहून ते कामाचा व्यवहार करणार होते. यावेळी घराच्या पायऱ्या चढत असताना फरहान अचानक पाय घसरून पडला. जमीनीवर खाली असलेली उघडी सळई फरहानच्या पोटात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. रक्तबंबाळ झालेल्या फरहानला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास फरहानचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी जिंसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .पुढील तपास पोलीस हवालदार जेढर करीत आहेत.