औरंगाबाद ( गंगापूर ) : मृतदेहाला मुंडके नसल्याने ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. मृतदेहाच्या खिशात आधार कार्ड मिळुन आले आहे. त्या आधारे मृताची ओळख पटली आहे. त्याचे नाव जुमन अली बागानुन आहे. तो फकीर गल्ली पोस्ट ऑफिस गंगापूर जवळचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरील व्यक्ती गेल्या दहा दिवसा पासुन घरातुन बेपत्ता असल्याचे बोलले जात आहे. तर या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साईनाथ गीते, पोलीस उपनिरीक्षक शकील शेख, हेड कॉन्स्टेबल कैलास निंभोरकर, विजय भिल्ल, श्रीकांत बर्डे,राहुल वडमारे गोपनीय शाखेचे मनोज नवले घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद : मुंडके धडावेगळे असलेला मृतदेह आढळुन आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. हा मृतदेह काही दिवसांपूर्वी येथे पडलेला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून , या मृतदेहाचे हिंस्र प्राण्यांने लचके तोडले आहेत. पोलिसांना मृतदेहाचे मुंडके कुरतडलेल्या अवस्थेत काही अंतरावर मिळून आले आहे. या घटनेची गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत.
अनोळखी तरुणीचा मृतदेह : या आधीही 7 जानेवारीला ठाणे जिल्हातील कसारा ग्रामीण पोलिसांना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कसारा नजीकच्या जंगल भागातील रस्त्याच्या कडेला सुमारे २१-२५ वयोगटातील एका अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. त्यातच ५ जानेवारी रोजी मुंबई आग्रा महामार्गा जवळ कसारा नजीकच्या वारलीपाडा गावातील जंगलात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला तरुणीचा मृतदेह एका प्रवाशाच्या नजरेस पडला होता. त्यानंतर त्याच प्रवाशाने मृतदेहा विषयी माहिती कसारा पोलिसांना दिली होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत तरुणीचा मृतदेह शहापूरमधील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला.
हॉस्टेलमध्ये सापडला मृतदेह : या आधीही 17 जानेवारीला बिहार येथील हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या आयआयएमच्या विद्यार्थ्यांचा मृतदेह सापडला होता.राजधानीच्या नागडी पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या आयआयएम संस्थेच्या वसतिगृहात शिवम पांडे नावाच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला होता. शिवमचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला मात्र, त्याचे दोन्ही हात बांधलेले होते. खून आणि आत्महत्या या दोन्ही मुद्द्यांवर या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
हेही वाचा : Surat Crime हत्या करून खांद्यावर मृतदेह नेला दवाखान्यात पाहा सीसीटीव्ही फुटेज