ETV Bharat / state

औरंगाबादेत कोरोनाचा नववा बळी, ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू; एकूण रुग्णांची संख्या २४४

महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून आज औरंगाबादमध्ये कोरोनाचा 9 वा बळी गेला आहे. नूर कॉलनीत राहणाऱ्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला.

औरंगाबाद
औरंगाबाद
author img

By

Published : May 2, 2020, 8:48 PM IST

औरंगाबाद - महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून आज औरंगाबादमध्ये कोरोनाचा 9 वा बळी गेला आहे. नूर कॉलनीत राहणाऱ्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यू पश्चात महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली.

शहरातील नूर कॉलनीतील 65 वर्षीय महिलेला आज रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सकाळी 8 वाजून 5 मिनिटांनी महिलेचा कोरोना, न्यूमोनिआ, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी विकाराने मृत्यू झाला. मृत्यूपश्चात महिलेची कोरोना चाचणी घेण्यात आली असून कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या शहरात 9 झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) डेडिकेटेड कोरोना रुग्णालयात सध्या 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 20 रुग्णांची स्थिती सामान्य आहे. 2 रुग्णांची स्थिती गंभीर आहे. कालपर्यंत घाटी रुग्णालयात केवळ 11 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. मात्र, एका खासगी रूग्णालयातून 6 , दुस-या रुग्णालयातून 3 आणि जिल्हा सामान्य रुग्णालय येथून एका रुग्णाला घाटीमध्ये हलवण्यात आले होते.

घाटीत शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत 185 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 18 जणांचे स्वॅब घेण्यात आलेले आहेत. त्यातील 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 7 रुग्णांचे अहवाल येणे बाकी आहे. शनिवारी दिवसभरात कोरोना बधितांची संख्या 28 ने वाढली आहे. यामध्ये 17 पुरूष आणि 11 महिला रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 244 कोरोनाबाधित आढळले.

जिल्ह्यातील 244 रुग्णांवरील उपचारांपैकी आतापर्यंत 24 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर एकूण 211 उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात 121 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात एकूण 8रूग्ण व उर्वरीत रुग्णांवर मनपाच्या कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.