औरंगाबाद - 2022 हे वर्ष राजकीय घडामोडींनी गाजले. राज्यात सत्ता कोणाची यासाठी संघर्ष सुरू होता, त्याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र दुसरीकडे बळीराजा आत्महत्येला ( Farmer Suicide In Marathwada ) कवटाळत होता. नापिकी, अतिवृष्टी यामुळे वर्षभरात तब्बल 997 शेतकऱ्यांनी ( 997 Farmer Commits Suicide In Marathwada ) आपली जीवन यात्रा संपवली आहे. त्यात सर्वाधिक 268 आत्महत्या बीड जिल्ह्यात ( Beed District Top In Farmer Suicide ) झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 94 शेतकरी अद्याप मदतीपासून वंचित आहेत.
मराठवाड्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी त्रस्त काही वर्षांपूर्वी मराठवाडा हा दुष्काळवाडा म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र मागील काही वर्षात निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळाला. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ असे निसर्गचक्र मराठवाड्यातील जनतेने अनुभवले आहे. त्यात सतत काही वर्षांपासून ओल्या दुष्काळाने शेतकरी त्रस्त झाला आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पीके नष्ट झाली आहेत. अति पावसाने हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलताना दिसून ( suicide In Marathwada In One Year ) आला. वर्षभराचा विचार केला तर ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक 123 आत्महत्या झाल्या आहेत. त्या पाठोपाठ जून महिन्यात 108 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
सर्वाधिक आत्महत्या बीडमध्ये 2022 या वर्षात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मराठवाड्यात 997 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. त्यात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या. बीडमध्ये 268, औरंगाबाद 173, जालना 117, परभणी 73, हिंगोली 44, नांदेड 147, लातूर 61 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 114 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. या आत्महत्यांमध्ये 94 प्रकरणे अद्यापही चौकशी अभावी प्रलंबित आहेत. यामध्ये अनेक प्रकरण डिसेंबर महिन्यातील आहेत. यामध्ये औरंगाबाद 10, जालना 4, परभणी 6, हिंगोली 3, नांदेड 13, बीड 42, लातूर 5, तर उस्मानाबाद जिल्ह्यात 11 शेतकरी आत्महत्यांचा प्रकरणांचा समावेश आहे. आत्तापर्यंत 756 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर 132 प्रकरण काही कारणांमुळे अनुदानापासून अपात्र ठरविण्यात आली आहेत.