ETV Bharat / state

92 farmers suicide : ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात 92 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सर्वाधिक आत्महत्या कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात

author img

By

Published : Jul 20, 2023, 5:48 PM IST

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण मोठे आहे. त्यातच गेल्या दोन महिन्यात मराठवाड्यात तब्बल ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्यामुळे नवीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यापुढे शेतकऱ्यांच्या चिंता कशा संपतील याचे मोठे आव्हान आहे.

Etv Bharat
Etv Bharat

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - जुलै महिना अर्ध्याहून अधिक संपला असला तरी, अद्याप मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस पडला नाही. परिणामी ऐन जून महिन्यात 92 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. सर्वाधिक आत्महत्या या नुकतेच कृषिमंत्री झालेल्या धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. त्यामुळे मंत्रीपद मिळाल्यानंतर सर्वात आधी आपल्या विभागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.

92 शेतकऱ्यांनी संपवले जीवन - मराठवाड्यात शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र थांबायला तयार नाही. वर्षाकाठी किमान रोज तीन शेतकरी आत्महत्या विभागात होतात. निसर्गाच्या कृपेने आलेल्या संकटाला कंटाळून बळीराजा टोकाचे पाऊल उचलत आहे. यावर्षी पुन्हा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. जून आणि जुलै महिन्यात अजूनही म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी ऐन पावसाळ्यात आपली जीवन यात्रा संपवली आहे. जून महिन्यात होणाऱ्या पावसावर शेती व्यवसाय अवलंबून असतो. काही ठिकाणी झालेल्या तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केली होती. मात्र समाधानकारक पाऊस न पडल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले. आता पैसे कसे आणावे या विचारात मराठवाड्यात तब्बल 92 शेतकऱ्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. मराठवाड्याचा विचार केला तर औरंगाबाद 10, जालना - 2, बीड - 30, परभणी - 6, हिंगोली - 4, लातूर - 6, नांदेड - 24, धाराशिव (उस्मानाबाद) - 10 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे.

धनंजय मुंडे यांच्या समोर आव्हान - मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच करण्यात आला. यावेळी कृषी खाते आमदार धनंजय मुंडे यांना देण्यात आले. मात्र राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी दिल्यामुळे मोठे आव्हान त्यांच्यासमोर निर्माण झाले. मागील सहा महिन्यात मराठवाड्यात 483 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. मागील सहा महिन्यात औरंगाबाद 60, जालना - 27, बीड - 128, परभणी - 38, हिंगोली - 17, लातूर - 34, नांदेड - 89, धाराशिव (उस्मानाबाद) - 90 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना नवीन कृषिमंत्री कसा दिलासा देऊ शकतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.