औरंगाबाद/नाशिक : नाशिक आग दूर्घटनेतील (Nahisk Jindal company fire) मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. (5 lakh Rs help to victim of Jindal Company Fire). येथील जिंदाल फॅक्टरीत लागलेल्या आगीत 17 जण जखमी झाले असून, 2 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. तसेच आणखी तीन कामगार अडकले असून त्यांना तातडीने मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या आधी सरकार सर्वपरी मदत करेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिल्लोड येथे दिली. येथील कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी ते आले होते. मात्र इगतपुरी येथे घटना घडल्यामुळे ते भाषण न करता मुंबईकडे रवाना झाले.
-
Maharashtra CM meets those injured in Nashik factory explosion
— ANI (@ANI) January 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
2 people have died, 17 injured in the incident. The expense of treating the injured will be borne by the govt. Ex-gratia of Rs 5 lakhs each will be given to families of the deceased. Inquiry to be conducted:CM Shinde pic.twitter.com/r5khozzD4z
">Maharashtra CM meets those injured in Nashik factory explosion
— ANI (@ANI) January 1, 2023
2 people have died, 17 injured in the incident. The expense of treating the injured will be borne by the govt. Ex-gratia of Rs 5 lakhs each will be given to families of the deceased. Inquiry to be conducted:CM Shinde pic.twitter.com/r5khozzD4zMaharashtra CM meets those injured in Nashik factory explosion
— ANI (@ANI) January 1, 2023
2 people have died, 17 injured in the incident. The expense of treating the injured will be borne by the govt. Ex-gratia of Rs 5 lakhs each will be given to families of the deceased. Inquiry to be conducted:CM Shinde pic.twitter.com/r5khozzD4z
जिंदाल स्फोट प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार व आमदार हिरामण खों सकार यांनी घटनास्थळी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी जखमींवर उपचार सुरू असलेल्या सुयश हॉस्पिटल येथे रुग्णांची विचारपूस केली. मुख्यमंत्री म्हणाले की, घटनेवर नियंत्रण मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहे. सर्वच यंत्रणा आपली भूमिका चोख बजावत आहे. केमिकल कंपनी असल्याने आग विझवण्यात काहीसा विलंब येत आहे. या स्फोटा प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अजित दादांनी असं वक्तव्य करणे चुकीचे : छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य आणि धर्मासाठी आपले प्राण दिले. औरंगजेबाने त्यांची कातडी सोलली, त्यांचे तुकडे तुकडे केले. मात्र त्यांनी धर्माची साथ सोडली नाही. त्यामुळे धर्मवीर ही पदवी त्यांना लोकांनी दिलेली आहे. त्याबाबत अजित पवारांनी असं बोलणं चुकीचं आहे. महापुरुषांवर झालेल्या वक्तव्यावर बोलताना अजित पवारांनी अनेक वेळा टीका केली आहे. त्यावर आता आम्ही त्यांना काय बोलावं असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला. तर लोकप्रतिनिधींनी बोलताना माहिती घेऊन बोलावं. टाळतम्या ठेवायला हवं अशी टीका देखील एकनाथ शिंदे यांनी केली.
सिल्लोड येथे कृषी प्रदर्शनाला सुरुवात : सध्या राज्यात चर्चेत असलेले कृषी प्रदर्शन सिल्लोड येथे सुरू करण्यात आले. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री ठाण्यावरून हेलिकॉप्टर द्वारे थेट सिल्लोड येथे दाखल झाले आणि त्यांनी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ भागवत कराड, राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, मलकमंत्री संदीपान भुमरे. खा इम्तियाज जलील यांच्यासह राज्यातील यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली. इगतपुरी येथील घटनेमुळे नेत्यांनी कार्यक्रम स्थळी भाषण करणे टाळले. फक्त उद्घाटन करून प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली.