ETV Bharat / state

कार झाडावर धडकून भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू, २ गंभीर जखमी - 4 died in car accident aurangabad

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये चौघांचा मृत्यू, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबाद-अहमदनगर रस्त्यावरील गोलवाडी फाट्याजवळ आज सकाळच्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

कार झाडावर धडकुन भीषण अपघात; ४ जणांचा मृत्यू झाला, २ गंभीर जखमी
4-died-in-car-accident-on-ahmednagar-aurangabad-highway
author img

By

Published : Nov 30, 2019, 10:55 AM IST

Updated : Nov 30, 2019, 3:33 PM IST

औरंगाबाद - जालन्यातील सहा तरुणांचा शिर्डी येथे दर्शनाला जात असताना कार झाडावर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात चार तरुण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. औरंगाबाद-अहमदनगर रस्त्यावरील गोलवाडी फाट्याजवळ आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

हेही वाचा - खळबळजनक! हैदराबादमध्ये पुन्हा आढळला महिलेचा जळालेला मृतदेह

दत्ता वसंतराव डांगे (वय-27), अमोल नंदकिशोर गावळकर (वय-22), आकाश प्रकाश मोरे (वय-30), अक्षय सुधाकर शीलवंत (वय-30, सर्व राहणार नेर शेवली, जी.जालना) अशी मृतांची नावे आहेत. तर संतोष राऊत वय-18, किरण गिरी वय-19 (दोन्ही राहणार नेर शेवली, जालना) अशी जखमींची नावे आहेत.

जालन्यातील शिवली गावातील हे सहाही तरुण शिर्डीला जाण्यासाठी शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास (एमएच 21 व्ही 581) या चारचाकीने निघाले होते. दरम्यान औरंगाबाद-अहमदनगर रस्त्यावरील गोलवाडी फाट्याजवळ येताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडावर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा संपूर्ण चुराडा झाला. या अपघातात दत्ता, अमोल, प्रकाश हे तीन जण जागीच ठार झाले तर उर्वरित तीन जण गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाल्याने अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देणयात आली.

4 died in car accident aurangabad
अपघातातील मृत व्यक्ती

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारमधून सर्वांना बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात हलविले मात्र, त्यावेळी गंभीर जखमी असलेल्या अक्षयची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी कार चालकांविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांनी दिली आहे.

गतीने विझले चार वंशांचे दिवे..

आज झालेल्या या अपघातात मृत पावलेले चारही तरुण हे कुंटुबातील एकुलते एक होते. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी कारची गती प्रचंड होती. जर कारची गती मर्यादेत असती तर या चौघांचाही जीव वाचला असता. मात्र, गतीच्या मोहापायी या तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर दोनजण मृत्यूशी झुंज देत आहेत.

Intro:Body:

औरंगाबाद - नगर-औरंगाबादरोड अपघातात चार ठार तर दोन गंभीर 

इंडिका कार झाडावर धडकल्याने अपघात

अपघातातील सहाही जणांना घाटी दवाखान्यात उपचारासाठी दाखल 

 चोघाचा मूर्त्यु तर दोघांवर घाटी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु 

 सर्वजण जालना जिल्ह्यातील शेवली येथील रहिवाशी

दत्ता डांगे, अक्षय शीलवंत,अक्षय मोरे,अमोल गवळकर मयताची नाव तर 

किरण गिरी, व अन्य एक जखमी

Conclusion:
Last Updated : Nov 30, 2019, 3:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.