औरंगाबाद - शरणापूर येथील भांगसी माता गडाकड परिसरात सायकलवर फिरण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी ( २१ फेब्रुवारी ) दुपारी उघडकीस आली. शिवराज संजय पवार (१७) प्रतीक आनंद भिसे (१५), तिरुपती मारोती कुदळकर (१५ सर्व रा. सारा संगम फेज -१, बजाजनगर) अशी शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
शरणापूर शिवारात भांगसी गड पायथ्याशी नारायण वाघामारे यांचे शेततळे ( Farm lake in Aurangabad ) आहे. सायकलवर फिरण्यासाठी गेलेले तीन मुले या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले. पण, त्यांचा शेततळ्यात बुडून मृत्यू ( 3 children death in Aurangabad ) झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांचेही मृतदेह शेततळ्यातून ( Fire brigade in Sharanapur ) बाहेर काढले आहेत.
हेही वाचा-मुंबईच्या दहिसर भागात गॅस पाईपमधून गळतीमुळे भीषण आग
पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू
शिवराज पवार, प्रतीक भिसे व तिरुपती हे तिघे शाळकरी मित्र रविवारी सुट्टी असल्याने दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दोन सायकलवरून शरणापूर येथील भांगसी माता गडावर फिरण्यासाठी गेले होते. गडाच्या पायथ्याशी शेततळे पाहून त्यांनी शेततळापासून जवळपास १५० मीटर अंतरावर त्यांच्या दोन्ही सायकली उभ्या केल्या ते तिघे शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र त्यांना शेततळ्यातील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघा जिवलग मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह काढले बाहेर...
दरम्यान घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी धाव घेत घटनेची माहिती अग्निशामन विभागाला दिली. अग्निशामन दलाचे अब्दुल अजीज, हरिभाऊ घुगे, राजू निकाळजे, इसाक शेख, दिपक गाडेकर आदी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिघा मुलांचे मृतदेह शेततळ्यातील पाण्यातून बाहेर काढले. पोलिसांनी शिवराज पवार, प्रतीक भिसे व तिरुपती कुदळकर यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.