औरंगाबाद - शहरात दिवसभरात 58 नवे रुग्ण आढळून आले आहेत. सकाळी 30 रुग्ण आढळून आल्यानंतर सायंकाळी 28 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या 900वर जाऊन पोहचली आहे, तर एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 26 वर जाऊन पोहोचली आहे.
शहरात दुपारी 28 कोरोनाबाधितांची वाढ झाली. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये कैलास नगर (1), चाऊस कॉलनी (1), मकसूद कॉलनी (2), हुसेन कॉलनी (4), जाधववाडी (1), न्यू बायजीपुरा, गल्ली नं.3 (1), एन सहा, संभाजी कॉलनी, सिडको (1), कटकट गेट (1), बायजीपुरा (10), अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको (2), लेबर कॉलनी (1), जटवाडा (1), राहुल नगर (1) आणि जलाल कॉलनी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 16 पुरुष आणि 12 महिला रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
तसेच राहुलनगर येथील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे. या महिलेला 15 मे रोजी अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. उपचार घेत असताना कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाला. मृत्यू पश्चात 16 मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मृतांची संख्या 26 वर गेली आहे.