ETV Bharat / state

औरंगाबादेत कामगाराचा गळफास, तर पिसादेवीत दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत वृद्धांची आत्महत्या - औरंगाबाद

औरंगाबादेत एका मजुराने गळफास घेत, तर दुसऱ्या एका वृद्धाने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली.

शवविच्छेदनानंतर मृतदेह नेताना
author img

By

Published : Jul 25, 2019, 7:41 PM IST

औरंगाबाद - शहरात दोन वेगवेगळ्या आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. हर्सूल तलाव भागातील हनुमान मंदिराजवळ एका ३५ वर्षीय मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर पिसादेवी भागातील ५५ वर्षीय वृद्धाने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

औरंगाबादेत कामगाराचा गळफास, तर पिसादेवीत दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत वृद्धांची आत्महत्या

हर्सूल येथे राहणारा प्रभाकर जगन्नाथ बर्डे या मजुराने परिसरातील एका झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, अद्यापही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

पिसादेवी भागात राहणारे रामचंद्र किसन चव्हाण यांना दमा आणि अर्धांगवायूच्या आजाराने ते अनेक दिवसांपासून ग्रस्त होते. ते सध्या मुलगा आणि सुनेसोबत राहत होते. मात्र, त्यांनी बुधवारी सायंकाळी आजाराला कंटाळून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली होती. उपचारादरम्यान रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Intro: हर्सूल तालावाजवळ हनुमान मंदिराजवळ एक 35 वर्षीय मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली तर पिसादेवी भागात एका 55 वर्षीय वृद्धाने घरच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रभाकर जगन्नाथ बर्डे वय-35 (रा.हर्सूल तलाव जवळ,जटवाडा रोड ) असे आत्महत्या करणाऱ्या मजुरांचे नाव आहे व रामचंद्र किसन चव्हाण वय-55 वर्षे (रा.जैननगरी, पिसादेवी) असे दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

Body:हर्सूल येथे राहणार मृत प्रभाकर या मजुराने परिसरातील हनुमान मंदिर परिसरात एका झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलं ही घटना आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास समोर आली या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र  समजू शकले नाही. तर दुपारी घटना पिसादेवी भागात घडली.

55 वर्षीय चव्हाण यांना दमा आणि अर्धांगवायूचा आजार असल्याने ते अनेक दिवसांपासून आजारी होते.पिसादेवी भागात ते मुलगा सून सोबत राहत होते.बुधवारी संध्याकाळी त्यांनी आजाराला कंटाळून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली होती. उपचारादरम्यान रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला .या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास हवलंदार डी के थोरे हे करीत आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.