वैजापूर (औरंगाबाद) - वैजापूर तालुक्यातील डागपिंपळगाव येथे शॉर्ट सर्किट होऊन शेतकऱ्यांचा 2 एकर ऊस जळून खाक झाला आहे. भाऊसाहेब कारभारी पवार या शेतकऱ्याचे गट नंबर 72 मधील 2 एकर ऊस जळून खाक झाल्याने नुकसान झाले. विद्युत महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - भाजपच्या समरजित घाटगे यांनी व्यक्त केल्या अर्थसंकल्पाकडून असलेल्या अपेक्षा
डागपिंपळगाव शिवारातील उसाला लागलेली आग आटोक्यात आणण्यात गावकऱ्यांच्या मदतीने यश आले आहे. मात्र, या आगीत 2 एकर ऊस जळून पूर्णपणे खाक झाला आहे. ही घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली असून आता आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे. मात्र, हा महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा परिणाम असल्याच्या गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
हेही वाचा - कौतुकास्पद! नांदेडच्या सामान्य कुटुंबातील कन्येची आसाम रायफलमध्ये निवड..!