ETV Bharat / state

Boy Suicide In Aurangabad : बेंचवर बसण्याच्या कारणावरून धमकी, मुलाने केली आत्महत्या - औरंगाबादेत मुलाची आत्महत्या

फर्दापूर येथे एका शाळेत मुलाला 'माझ्या मुलीच्या बेंचवर का बसतो', असे म्हणून धमकी देण्यात आली. त्यानंतर या १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केली ( Boy Suicide In Aurangabad ) आहे.

आत्महत्या
आत्महत्या
author img

By

Published : Feb 15, 2022, 7:41 PM IST

फर्दापूर ( औरंगाबाद ) : माझ्या मुलीच्या शाळेतील बेंचवर का बसला? असे म्हणून शिविगाळ करून एकास मारहाण करण्यात आली. तुला माझे नातेवाईक सोडणार नाही. तुझे नाव शाळेतून काढून टाकील, अशी धमकी दिल्यामुळे १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केली ( Boy Suicide In Aurangabad ) आहे. मुलाच्या पित्याच्या फिर्यादीवरून धमकी देणाऱ्या महिलेवर फर्दापूर पोलीस ठाण्यात ( Fardapur Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलेने दिली धमकी

सय्यद राजिक सय्यद आरिफ (४२) रा.ठाणा, ता. सोयगाव यांनी फर्दापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, योगिता ( पूर्ण नाव व पता नाही ) नामक महिलेने दि.१ ०फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास के. पी. पार्क हाँटेलसमोर माझा मुलगा सय्यद परवेज सय्यद राजिक वय(१५) यास 'तू माझ्या मुलीच्या शाळेतील बँंचवर का बसला', असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली व तुला माझे नातेवाईक सोडणार नाही. तसेच तुझे नाव शाळेतून काढून टाकील, अशी धमकी दिली. त्याच विचाराने दि. १३ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजे च्यापुर्वी तो राहत असलेल्या लाँजिंगच्या रुम नंबर १ मधे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सय्यद परवेज याच्यावर सोयगाव येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण आले. आज मयत मुलाचे नातेवाईक फर्दापूर पोलीस ठाण्यात एकत्र होऊन जोपर्यंत आरोपी महिलेला ताब्यात घेणार नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने परिसरात काही काळ तनाव होता.

महिलेवर गुन्हा दाखल

मयत सय्यद परवेज याचे वडील सय्यद राजिक सय्यद आरिफ यांच्या फिर्यादी वरून योगिता नामक महिले विरोधात फर्दापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि.३०६/३२३/५०४/५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फर्दापूर पोलीस करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.