छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लिफ्टमध्ये खेळत असताना अचानक दरवाजा बंद झाल्याने तेरा वर्षीय मुलाला जीव गमवावा लागला. शहरातील जिन्सी भागात ही घटना घडली आहे. साकीब सिद्दिकी असे या मुलाचे नाव आहे. तेरा वर्षीय हा मुलगा खेळत असताना लिफ्टमध्ये बसला. त्याने तोंड बाहेर काढले, तितक्यात दरवाजा लागला. यावेळी मान अडकल्यानंतर त्याचा गळा कापला गेला. त्याला सुटका करून घेण्याची संधीदेखील मिळाली नाही. लिफ्टमधून सुटका होईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जीन्स पोलिसात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
खेळता खेळता लिफ्टमध्ये गेल्यानंतर अचानक दरवाजा बंद होऊन साकेब सिद्दिकी मुलाचा लिफ्टच्या गेटमध्ये अडकून मृत्यू झाला. ही घटना इतकी भीषण होती की गेटमध्ये मुलाचा अर्धा गळा कापला गेला. लिफ्टमध्ये डोके अडकल्यानंतर रक्ताची चिरकांडी उडाली. क्षणात त्याचा मृत्यू झाला. रविवारी रात्री साडेनऊ वाजता साकीब तिसऱ्या मजल्यावर खेळत असताना तो लिफ्टमध्ये गेला. त्यातच त्याने खेळता-खेळता लिफ्ट सुरू केली. परंतु, अचानक दरवाजा बंद झाला. बाहेर पाहताना त्याचा गळाच दरवाजात अडकला. घटनेनंतर जोरात आवाज झाला. घटना घडताच इमारतीतील सर्व रहिवाशांनी तिसऱ्या मजल्यावर धाव घेतली. प्रत्यक्ष दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला.
आजी आजोबांकडे असताना घडली घटना- जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारी यांना घटना कळताच त्यांनी सहकाऱ्यांसह धाव घेतली. त्यानंतर साकीबचा मृतदेह घाटी रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात पाठवण्यात आला. साकीबच्या वडिलांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. व्यवसायानिमित्त त्याचे आई-वडील नुकतेच हैदराबादला गेले होते. त्यामुळे साकीबचा सांभाळ करण्यासाठी त्याला कटकट गेट भागातील हयात हॉस्पिटलजवळील इमारतीत राहणाऱ्या आजी-आजोबांकडे ठेवले होते. लिफ्टमध्ये खेळताना लहान मुलांकडे लक्ष द्या असे आवाहन नेहमीच केले जाते. मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पालकांनी लिफ्टमध्ये मुलांना एकटे जाण्याची परवानगी देऊ नये. तसेच लिफ्टमध्ये खेळण्यास मज्जाव करावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
हेही वाचा-
E - Cigarettes Seized in JNPT : जेएनपीटीमध्ये 3 कोटी किमतीचे ई-सिगारेट जप्त