अमरावती - अमरावतीवरून भरधाव वेगाने येणाऱ्या कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या चारचाकीने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिली. यामध्ये तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात; महामार्गावर वाहतूक कोंडी
देवकिसन श्रीचन्द राठोड (वय ४०), असे मृताचे नाव आहे. तो विरगव्हान येथील रहिवासी आहे. तसेच तो कुऱ्हा येथे पशुवैद्यकीय रुग्णालयात कार्यरत होता. गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आपले काम आटोपून विरगव्हान येथे आपल्या घरी दुचाकीने परत जात होता. कुऱ्हा जवळील पेट्रोल पंपाजवळ आला असता समोरून येणाऱ्या कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या चारचाकीने त्याला जोरदार धडक दिली. यामध्ये चारचाकीचे समोरील चाक त्याच्या पायावरून गेले. तसेच तो गंभीर जखमी झाला. मात्र, त्याला त्याच अवस्थेत सोडून चालक सुधीर शिरभाते फरार झाला.
नौका खडकावर आदळल्याने दहा लाखांचे नुकसान, दहा खलाशांना वाचवण्यात यश
ग्रामस्थांना बातमी समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याला नागपूरला हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर शेकडो गावकऱ्यांनी कुऱ्हा पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यांनी आरोपीला अटक करण्याची मागणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिंगटे यांनी परिस्थिती हाताळून ग्रामस्थांना शांत केले. तसेच आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कुऱ्हा पोलीस करीत आहे.