अमरावती - नदी पात्रात मासे पकडण्याकरिता गेलेल्या तीन युवकांपैकी एक युवक (35) वाहून गेल्याची घटना घडली आहे. नितीन शेंडे असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलू येथील बेंबडा नदी पात्रात घडली.
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे नद्या-नाले वाहू लागले आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलू येथील बेबंडा नदीदेखील ओसंडून वाहत आहे. नितीन हा याठिकाणी मासे पकडण्याकरिता गेले होता. यावेळी पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला.
हेही वाचा - अमरावतीच्या जयस्तंभ चौकातील तीन मजली इमारत कोसळली
घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. बचाव पथकाचे शोध कार्य सुरू आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.