ETV Bharat / state

अमरावतीत नदीमध्ये फुले सोडण्याकरीता गेलेल्या युवकाचा गाळात अडकल्याने मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील चंद्रभागा नदीमध्ये घरातील पुजेची फुले वाहण्याकरीता गेलेल्या युवकाचा नदीच्या गाळात अडकल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अमरावतीत नदीमध्ये फुले सोडण्याकरीता गेलेल्या युवकाचा गाळात फसुन मृत्यु
author img

By

Published : Jul 21, 2019, 11:28 PM IST

अमरावती - चांदूर रेल्वे शहरातील अमरावती रोड येथील पंचधारा मंदिरा शेजारील चंद्रभागा नदीमध्ये एका युवकाचा नदीतील गाळात अडकल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घरातील पुजेची फुले नदीत वाहण्याकरीता तो नदीकिनारी गेला होता.

शहरातील शेंद्रीपुरा येथील सागर दिलीप लिखार (वय १७ वर्षे) हा युवक रविवारी सकाळी ११.३० वाजता घरातील पुजेची फुले पिशवीत भरून सायकलने अमरावती रोडवरील चंद्रभागा नदीजवळ गेला. फुले नदीत सोडण्याकरीता नदीत उतरला असता, तो पाय घसरून नदीच्या खड्डामध्ये पडला. अनेक तास झाले तरिही मुलगा घरी परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. यावेळी सागरचे वडील शोध घेताना नदीजवळ गेले असता तेथे पिशवी आणि सायकल आढळून आली. त्यामुळे नदीमध्ये शोधकार्य सुरू केले. तेव्हा नदीच्या पुलाच्या कामासाठी नालीचे खोदकाम केलेल्या गाळात सागरचा मृतदेह अडकला होता. गाळातुन मृतदेह बाहेर काढल्यानंतर स्थानिक ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रात्री शोकाकुल वातावरणात सागरवर अंत्यसंस्कार करण्यात आले. सागर १२ व्या वर्गात मांजरखेड (कसबा) येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता.

Intro:नदी फुले वाहण्याकरीता गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा गाळात फसुन मृत्यु

अमरावतीच्या चांदूर रेल्वेतील पंचधारा मंदिराजवळील चंद्रभागा नदीतील घटना
-----------------------------------------------------------
अमरावती अँकर

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील अमरावती रोडवरील पंचधारा मंदिराजवळील चंद्रभागा नदीमध्ये घरातील पुजेचे फुले वाहण्याकरीता गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा नदीच्या गाळात फसुन मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. या घटनेने परिसरात शोकलहर पसरली आहे.

चांदूर रेल्वे शहरातील शेंद्रीपुरा येथील सागर दिलीप लिखार (वय १७ वर्षे) हा युवक रविवारी सकाळी ११.३० वाजता घरातील पुजेचे फुले थैलीत भरून सायकलने अमरावती रोडवरील चंद्रभागा नदीजवळ गेला. त्यानंतर फुले नदीत वाहण्याकरिता खाली उतरला असता पाय घसरून तो नदीच्या खड्डामध्ये पडला. घरी अनेक तास झाल्यानंतरही मुलगा घरी परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध घेतली. मृतकाचे वडील शोध घेतांना नदीजवळ गेले असता तेथे थैली व सायकल आढळून आली. त्यामुळे या नदीतमध्ये शोधकार्य केले. नदीच्या पुलाच्या कामासाठी नालीचे खोदकाम केल्यामुळे सदर युवक गाळात अडकला होता. रामकु सुरजुसे या व्यक्तीने सदर युवकाचे प्रेत गाळातुन बाहेर काढले. यानंतर स्थानिक ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदन करून रात्री ८ वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सागर १२ व्या वर्गात मांजरखेड (कसबा) येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.