ETV Bharat / entertainment

अंकिता लोखंडेनं साजरा केला पती विकी जैन आणि कुटुंबाबरोबर वाढदिवस, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल - ACTRESS ANKITA LOKHANDE

अंकिता लोखंडेनं पती विकी जैन आणि कुटुंबाबरोबर आपला वाढदिवस साजरा केला. विकीनं वाढदिवासाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Ankita lokhande
अंकिता लोखंडे (Vicky Jain and Ankita lokhande - instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 6 hours ago

मुंबई : 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेनं 19 डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा केला. अंकितानं आपला वाढदिवस पती विकी, दिर आणि जाऊबाईबरोबर साजरा केला. आता विकी जैननं त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विकी जैन पत्नी अंकिता लोखंडेबरोबर वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला दोन छोटे मुले आनंदी असल्याचे दिसतात. यानंतर अंकिता ही पती विकीबरोबर हॉलमध्ये येते. ब्लॅक ट्रॅक सूट आणि ब्लू डेनिम जॅकेट घातलेली अंकिता यावेळी एकदम स्टाईलिश लूकमध्ये दिसते. हॉलमध्ये प्रवेश करताच सजावट पाहून अंकिता आनंदी होते. यानंतर ती तिच्या जाऊबाईला मीठी मारते.

अंकिता लोखंडेचा वाढदिवस : यानंतर ती दिराच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेते आणि केक कट करून आपला आनंद व्यक्त करताना दिसते. अंकिताच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ पोस्ट करताना विकीनं त्याच्या लेडी लव्हसाठी यावर सुंदर असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये त्यानं लिहिलं, 'खरोखर एक खास दिवस. ते म्हणतात की प्रेम ही जगातील सर्वात सुंदर भावना आहे, मी याला जास्त सहमत नाही. माझ्या जिवलग मैत्रीण माझ्या आयुष्याची जोडीदार झाल्यानंतर सर्व काही चांगले झाले आहे! विकीनं पुढं लिहिलं, 'मंकू, तू आमच्याबरोबर असते, तेव्हा घर हे, घर असते. तू असते तर सब बेस्ट वाटते. आज, या विशेष दिवशी, माझ्याकडे फक्त प्रेमाशिवाय काहीही नाही! वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या प्रिये!' तुला सर्वांचे प्रेम मिळो आणि बाप्पा सर्व बेस्ट करेल.'

वर्कफ्रंट : आता अनेक चाहते अंकिताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. ही पोस्ट अनेकांना लाईक केली आहे. दरम्यान अंकिता आणि विकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटामध्ये दिसली होती. या चित्रपटात तिच्याबरोबर रणदीप हुड्डा दिसला होता. याशिवाय विकी हा आता 'फौजी 2' मालिकेमधून पदार्पण मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत आहे. या मालिकेत तो लीड रोलमध्ये दिसणार आहे. आता विकीचा अनोखा अंदाज या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

हेही वाचा :

  1. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी गोंडस मांजरीचं केलं स्वागत, व्हिडिओ व्हायरल - vicky jain
  2. अंकिता लोखंडे आणि तिची सासू रंजना जैनचा मंदिरातील व्हिडिओ व्हायरल, यूजर्सनं केलं ट्रोल - Anikita Lokhande News
  3. अंकिता लोखंडे 'आम्रपाली' वेब सीरीजमध्ये दिसणार, निर्मात्यांनी केलं पोस्टर शेअर - ANKITA LOKHANDE

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.