नवी मुंबई Smriti Mandhana World Record : भारतीय महिला क्रिकेट संघाची आक्रमक सलामीवीर स्मृती मंधानासाठी 2024 हे वर्ष T20 इंटरनॅशनलमध्ये आतापर्यंतचं सर्वोत्कृष्ट वर्ष ठरलं आहे, ज्यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तीनही सामन्यांमध्ये तिनं अर्धशतकं झळकावली होती.
𝙒𝙄𝙉𝙉𝙀𝙍𝙎!
— BCCI Women (@BCCIWomen) December 19, 2024
Congratulations #TeamIndia on winning the #INDvWI T20I series 2⃣-1⃣ 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/Fuqs85UJ9W@IDFCFIRSTBank pic.twitter.com/IqwvSkLyQe
भारताचा 60 धावांनी विजय : गुरुवार 19 डिसेंबर रोजी खेळल्या गेलेल्या या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या निर्णायक सामन्यात, मंधानानं 47 चेंडूत 77 धावांची शानदार खेळी केली आणि 20 षटकांत संघाची धावसंख्या 217 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या धावसंख्येच्या तुलनेत वेस्ट इंडिजचा महिला संघ 20 षटकांत केवळ 157 धावांपर्यंत मजल मारु शकला आणि त्यांना सामन्यात 60 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. मंधानानं महिला T20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 77 धावांच्या खेळीसह एक नवीन विक्रमही रचला आहे ज्यात तिनं श्रीलंकेची खेळाडू चमारी अटापट्टूचा विक्रम मोडला आहे.
Harmanpreet Kaur 🤝 Smriti Mandhana
— BCCI Women (@BCCIWomen) December 19, 2024
𝙏𝙝𝙖𝙩 𝙬𝙞𝙣𝙣𝙞𝙣𝙜 𝙛𝙚𝙚𝙡𝙞𝙣𝙜 😃🏆
Scorecard ▶️ https://t.co/Fuqs85UJ9W#TeamIndia | #INDvWI | @IDFCFirstbank pic.twitter.com/1uGEtVKOUB
मंधानानं ठोकले 7 चेंडूत 7 चौकार : स्मृती मंधनानं तिसऱ्या आणि चौथ्या षटकात ही कामगिरी केली. तिसरं षटक टाकताना हेन्रीच्या चौथ्या चेंडूवर मंधानानं चौकार मारला. मंधानानं पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार मारला. यानंतर चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मंधानाला स्ट्राइक मिळाला आणि या खेळाडूनं डॉटिनच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार आणि पाचव्या चेंडूवर चौकार लगावला. अशाप्रकारे मंधानानं सलग 7 चौकार लगावले.
4⃣6⃣4⃣
— BCCI Women (@BCCIWomen) December 19, 2024
Captain Smriti Mandhana in sublime touch! ✨#TeamIndia 40/1 after 4 overs
Live ▶️ https://t.co/Fuqs85UJ9W#INDvWI | @IDFCFIRSTBank | @mandhana_smriti pic.twitter.com/1tLjTYqfds
मंधानाची खास हॅट्ट्रिक : स्मृती मंधानानं केवळ सलग 7 चौकारच ठोकले नाहीत, याशिवाय तिनं केवळ 27 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मोठी गोष्ट म्हणजे या मालिकेतील मंधानाचं हे तिसरं अर्धशतक आहे. अशा प्रकारे तिनं अर्धशतकांची हॅट्ट्रिक केली. मंधानानं पहिल्या T20 सामन्यात 54 धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या सामन्यात या खेळाडूनं 62 धावांची खेळी केली होती.
मंधानाचा विश्वविक्रम : तिसऱ्या T20 मध्ये अर्धशतक झळकावून मंधानानं विश्वविक्रमही आपल्या नावावर केला. मंधाना आता T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक फिफ्टी प्लस स्कोअर असलेली खेळाडू बनली आहे. मंधानानं T20 क्रिकेटमध्ये 30 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत. एवढंच नाही तर T20 मालिकेत सलग तीन अर्धशतकं झळकावणारी ती पहिली महिला भारतीय क्रिकेटपटू आहे. जर आपण पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंबद्दल बोललो, तर विराट कोहलीनं 2016 मध्ये ही कामगिरी केली आहे.
Three matches..
— BCCI Women (@BCCIWomen) December 19, 2024
..And a hat-trick of FIFTIES 🙌
Captain Smriti Mandhana led from the front and she is named the Player of the Series 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/Fuqs85UJ9W#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank | @mandhana_smriti pic.twitter.com/CcRGptgbhf
मंधाना आंतरराष्ट्रीय T20 मध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू : सन 2024 मध्ये, स्मृती मंधानानं एकूण 23 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यात तिनं 21 डावात फलंदाजी केली आणि 42.38 च्या सरासरीनं एकूण 763 धावा केल्या, ज्यात तिचा स्ट्राइक रेट 126.53 होता. यासोबतच स्मृती मंधाना ही महिला T20 आंतरराष्ट्रीय कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे. याआधी हा विक्रम श्रीलंकेची दिग्गज खेळाडू चमारी अटापट्टूच्या नावावर होता, जिनं यावर्षी 21 सामन्यांत 40 च्या सरासरीनं 720 धावा केल्या होत्या ज्यात 2 शतकं आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
महिला T20 आंतरराष्ट्रीय कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडू :
- स्मृती मंधाना (भारत) - 763 धावा (वर्ष 2024)
- चामारी अटापट्टू (श्रीलंका) - 720 धावा (2024)
- ईशा ओजा (यूएई) - 711 धावा (2024)
- हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज) - 700 धावा (2024)
- काविशा एगोदागे (यूएई) - 696 धावा (2022)
हेही वाचा :