ETV Bharat / state

रेमडेसिवीर इंजेक्शनचा अवाजवी वापर टाळा; पालकमंत्री यशोमती ठाकूर

जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांतील स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते.

आढावा बैठक
आढावा बैठक
author img

By

Published : Apr 24, 2021, 5:01 PM IST

अमरावती - खासगी रुग्णालयांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा अनावश्यक वापर होता कामा नये, रेमडेसिवीर उपलब्धता व नियंत्रणासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. मात्र, गरज नसेल तिथे अवाजवी वापर होणे चुकीचे आहे. याबाबत शासनाने वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व रूग्णालयांकडून पालन व्हावे, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांतील स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, उपजिल्हाधिकारी राम लंके यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते.

रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करा -

कोरोना उपचारात रेमडेसिवीर हाच एकमेव रामबाण उपाय समजून खासगी डॉक्टर त्याचा अवाजवी वापर करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ते तत्काळ थांबावे. गरज नसलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही रेमडेसिवीरची मागणी होत असेल तर डॉक्टरांकडून त्यांचे समुपदेशन झाले पाहिजे. सर्व रुग्णालयांना गरजेनुसार इंजेक्शन, ऑक्सिजन आदी बाबी उपलब्ध करून दिल्या जातील. रेमडेसिवीर, ऑक्सिजन, लस आदी सर्व बाबींची कमतरता भासू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. मात्र, महामारीच्या या काळात आवश्यक तिथेच औषधांचा वापर, अवाजवी वापर टाळणे, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व रुग्णालयांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथक

जिल्ह्यात गरजू रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावरून समन्वय ठेवण्यात येत आहे. रेमडेसिवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी व काळा बाजार होऊ नये यासाठी भरारी पथकही नेमण्यात आले आहे. तसेच सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्यात येत आहे. कोरोना उपचारात वेळेवर निदान होणे, कुठलीही लक्षणे जाणवताच वेळीच औषधोपचार सुरु करणे हेही गरजेचे आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संचारबंदी, कोरोना त्रिसूत्रीचे पालन बंधनकारक करण्याबरोबरच, जिल्ह्यात ‘स्टीम सप्ताह’ राबविण्यात येत आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी कोविड सुसंगत जीवनशैली आत्मसात करणे बंधनकारक आहे. त्यानुसार सर्व रुग्णालयांनीही रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्याबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी संदेश प्रसारण, फलक आदी उपक्रम राबवावेत, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन -

साथ नियंत्रणासाठी प्रशासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून उपचार, जनजागृती व प्रतिबंधात्मक कार्यवाही आदी विविध स्तरांवर प्रयत्न होत आहेत. या प्रयत्नांना सर्वांनी साथ देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.