अमरावती - दिल्ली येथील शेतकरी आंदोलना वरून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन हाताळण्यास अपयशी ठरले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः का समोर येत नाहीत, ते आपल्या नेत्यांना आंदोलन हाताळण्यासाठी पाठवत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदीनी समोर येऊन हे आंदोलन सोडवले पाहिजे. या आंदोलनात फूड पाडण्याचा डाव केंद्र सरकारचा असल्याचा आरोप मंत्री यशोमती ठाकुर यांनी केला आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून संविधानाची तोडफोड केली जात आहे. शेतकरी देशाचा कना आहे. कृषी विधेयक हे बड्या उद्योगपतींना फायदेशीर आहे. केंद्र सरकारला सामान्य माणूस व शेतकऱ्यांचे काही लेन देणं नाही, असहि महिला व बालकल्याण यशोमती ठाकूर म्हणाल्या.
आपण देशाच्या संविधानाला मानतो, त्यामुळे येथे आंदोलन करण्याचा अधिकार हा प्रत्येकालाच आहे. केंद्र सरकार ला ते आंदोलनं हाताळता येत नाही, म्हणून त्यांनी ते हायकोर्टाला सोपवले आहे. ज्या प्रकारे हे आंदोलन केंद्र सरकार सांभाळत आहे, ते चुकीच्या पद्धतीने संभाळत आहे. यावर पंतप्रधान मोदी यांनी बोलले पाहिजे असेही ठाकूर म्हणाल्या.