ETV Bharat / state

अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या - अमरावती

अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या
author img

By

Published : Apr 10, 2019, 7:52 PM IST

अमरावती - अनैतिक संबधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शहरातील चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव येथे ही घटना घडली.

३ एप्रिलला रविंद्र उर्फ रवी पवार(४५) यांची हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत आरोपीचा शोध लावून मृताची पत्नी व तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृत रवींद्र पवारची पत्नी अर्चना पवार (वय ३०) व आरोपी अजय अंबाडकर (रा. थुगाव पिपरी) या दोघांचे गेल्या काही महिन्यापासून अनैतिक संबध असल्याचा संशय हा रवींद्रला होता. संशयाच्या भरात रविंद्र दारू पिऊन अर्चनाला वारंवार मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही देत होता. या भितीपोटी अर्चना व तिचा प्रियकर अजय यांनी कट रचुन अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा कायमचाच काटा काढण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे घटनेच्या दिवशी अजय, रवींद्र व त्याची अर्चना हे शेती लागवडीचे पैसे आणण्यासाठी गेले. त्याठिकाणी अजयने रविंद्रला दारू पाजली. घरी परतत असताना अजयने रस्ता खराब असल्याचे सांगत दोघांना काही अंतर पायी येण्यासाठी सांगितले.

त्यावेळी आरोपी अजय हा आपली दुचाकी घेऊन पुढे जाऊन थांबला. तेव्हा मागून येणारे रविंद्र व त्याची पत्नी अर्चना जवळ येताच आरोपी अजय अंबाडकरने रविंद्रच्या डोक्यात काठीने घाव घातला. तर पत्नी अर्चनाने आपल्याच पतीवर विळ्याने वार करून पतीची हत्या केली. त्यानंतर या दोघांनी मृतदेह फरफटत नेऊन एका विहिरीत टाकला. याप्रकरणी आरोपी अजय अंबाडकर व आरोपी पत्नी अर्चना पवार हीला करजगाव पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास करजगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार मुकुंद कवाडे करत आहेत.

Intro:*अनैतिक संमधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केली हत्या.*

*अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव येथील घटना*
-----------------------------------------------
अँकर अमरावती
पत्नीचे असलेले अनैतिक समंध याची भंनक पतीला लागल्याने पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या आपल्या पतीचीच हत्या केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव येथील शेतशिवारात तीन तारखेला घडली होती . पोलिसांनी सखोल तपास करत आरोपीचा छडा लावत मृतकाची पत्नी व तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अमरावती जिल्ह्यातील करजगाव येथील रहिवाशी रवींद्र उर्फ रवी पवार वय 45 असे मृतकाचे नाव आहे.मृतक रवींद्र पवार याची पत्नी अर्चना पवार वय 30 व आरोपी अजय अंबाडकर रा .थुगाव पिपरी या दोघांचे गेल्या काही महिन्या पासून अनैतिक समंध असल्याचा संशय हा मृतक रवींद्र ला येत होता .याचं संशयाच्या भरात दारू पिऊन तो पत्नीला वारंवार मारहाण करून जीवे मारण्याची धमकीही देत होता.याच भितीपोटी मृतकाची पत्नी व तिचा प्रियकर आरोपी यांनी कट रचत अनैतिक संमधात अडसर ठरणाऱ्या पतीचा कायमचाच काटा काढण्याचा निर्णय घेतला .ठरल्या प्रमाणे घटनेच्या दिवशी तीन तारखेला आरोपी अजय ,मृतक रवींद्र व त्याची पत्नी हे शेती लागवडीचे पैसे आणायला लाखनवाडी ला गेले. तेथे आरोपींनी मृतकाला दारू पाजली .तेथून तिघेही परत येत असताना .आरोपीने रस्ता खराब असल्याचे सांगत दोघांना काही अंतर पायदळ यायला सांगितले.तेवढ्यात आरोपी हा आपली दुचाकी घेऊन पुढे गेला व थांबला तेवढ्यात मृतक रवींद्र व त्याची पत्नी अर्चना जवळ येताच आरोपी संजय अंबाडकर ने मृतक रवींद्र च्या डोक्यात काठीने घाव घातला तर पत्नीने आपल्याच मृतक पतीवर विळ्याने सपासप वार करून पतीची हत्या केली. त्यानंतर या दोन्ही आरोपींनी मृतदेह हा फरफटत एका विहरीत टाकून दिला . सदर घटनेत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून आरोपी अजय अंबाडकर व आरोपी पत्नी अर्चना पवार हिला करजगाव पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास करजगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकुंद कवाडे करत आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.