अमरावती - कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र झटपट मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने ही व्यवस्था जिल्हा सामान्य रुग्णालयातच उपलब्ध करुन दिली असल्याने मृत्यू प्रमाणपत्रासाठी महापालिकेत चकरा मारण्याची गरजच राहिली नाही. या सुविधेमुळे दुःखाचे डोंगर कोसळल्या कुटुंबियांना सहज सुविधा उपलब्ध झाली आहे.
अशी आहे प्रक्रिया
शासकीय कोविड रुग्णालयात दगावणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांना हातोहात एक चार नंबरचा फॉर्म दिला जातो. अनेकदा दुःखाच्या भरात आपला व्यक्ती दगावला त्या दिवशी घेणे शक्य झाला नाही तर एक दोन दिवसांत कधीही कोविड रुग्णालयात संबंधित व्यक्तिंना हा फॉर्म मिळतो. या फॉर्मवर कोरोनामुळे दगवलेल्या व्यक्तीची हवी ती माहिती भरल्यावर या फॉर्मसोबत मृत व्यक्तीच्या आधार कार्डची झेरॉक्साची प्रत जोडावी लागते. त्यानंतर हा फॉर्म जिल्हा सामान्य रुग्णालयातील रेकॉर्ड रुमला देताच फॉर्मवरील संपूर्ण महिती संबंधित कर्मचारी मोबाईल अॅपवर भरून कोरोनाने दगवलेल्या संबंधित व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र अॅप वरच तयार करून घेतात. त्यानंतर हे प्रमाणपत्र रुगणलायच्या प्रशासकीय विभागात मेलवर पाठवले जाते. त्या ठिकाणी या मृत्यू प्रमाणपत्राची नोंद करून हे प्रमाणपत्र मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला दिले जाते. प्रशाकीय विभागातून मिळालेल्या या प्रमाणपत्रावर शिक्का घेण्यासाठी पुन्हा रेकॉर्ड रुमला यावे लागत. या ठिकाणी प्रमाणपत्रावर शिक्का मारला की प्रमाणपत्र अधिकृत मानले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया तासाभरात पूर्ण होते.
महापालिकेत चकरा मारण्याचा त्रास वाचला
कोरोनामुळे दगावलेल्या व्यक्तिंचे मृत्यू प्रमाणपत्र जिल्हा सामान्य रुग्णालयात सहज प्राप्त होत असल्याने नागरिकांना महापालिकेत चकरा मारण्याचा त्रास वाचला. पूर्वी कोरोनाने दगवलेल्या व्यक्तीची नोंद महापालिकेत व्हायची. मृत व्यक्तींच्या नातेवाईकाला मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यास चार ते पाच दिवस लागत होत. कधी 15 दिवस तर महिना झाला तरी प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत होत्या.
8 दिवसात 46 जणांचा मृत्यू
अमरावती जिल्ह्यात कोरोनामुळे आजपर्यंत एकूण 569 जणांचा मृत्यू झाला असून 1 मार्च ते 8 मार्च या आठ दिवसात एकूण 46 जण कोरोनामुळे दगावले आहेत. जिल्ह्यात सध्या 6 हजार 441 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत.
हेही वाचा - देशातील २५ श्रेष्ठ खासदारांमध्ये अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा समावेश
हेही वाचा - आजचा अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा बाजार - अनिल बोंडे