अमरावती - दरवर्षी कृषी विभागामार्फत अमरावती जिल्ह्यात ठिकठिकाणी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करन्यात येते.त्याच पार्श्वभूमीवर मेळघाटात मधील अस्सल रानभाज्याचा महोत्सव चिखलदरा तालुका कृषी विभागाच्या वतीने साजरा करण्यात आला मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते या रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
मेळघाटातील रानभाज्यांचा महोत्सव पावसाळ्यात जंगलात निघणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘रानभाजी महोत्सव’ साजरा करण्यात येत असतो. मानवी आरोग्यासाठी सकस आहाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. रानभाज्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्यासाठी उपयुक्त असतात. रानावनात, शेतशिवारात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांची नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात आदिवासी भागातील अनेक शेतकऱ्यांनी मेळघाटाच्या जंगलातील विविध प्रकारच्या रानभाज्या आणल्या होत्या.हेही वाचा - प्रत्येक परदेशी उत्पादनावर बहिष्कार घालणे असा स्वदेशीचा अर्थ नव्हे - मोहन भागवत