ETV Bharat / state

ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाब पापळकर झाडांबद्दल काय सांगतात? ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट

अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील बेवारस, अनाथ, मूकबधिरांचे पालक आणि जेष्ठ समाजसेवक असलेल्या शंकरबाबा पापळकर यांच्यासह त्यांच्या येथील (११५) मुलांनी मागील पंचवीस वर्षात तब्बल १५ हजारांपेक्षा जास्त झाडे लावले आहेत.

स्वर्गीय अंबादासपंत वैद्य मतिमंद बालगृह परिसर

author img

By

Published : Jun 5, 2021, 2:23 AM IST

अमरावती - दिवसेंदिवस ग्लोबलायझेश मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन हे बिघडत चाललेले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी 'झाडे लावा झाडे जगवा' असे आवाहन कायम केले जाे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक लोक झाडेगी लावतात. मात्र, त्यातील काही जण केवळ नावासाठी किंवा फोटोसाठी झाडे लावतात. झाडे लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या झाडाकडे कुणी फिरकूनही पाहत नाही. मात्र, फक्त फोटो काढणारे आणि त्याची जाहीरात करणारे लोक असले तरी यापासून वेगळे असणारे लोकही आहेत. अशाच एका पालक आणि मुलांनी सुमारे १५ हजार पेक्षा जास्त झाडे लावले आहेत. अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील बेवारस, अनाथ, मूकबधिरांचे पालक आणि जेष्ठ समाजसेवक असलेल्या शंकरबाबा पापळकर यांच्यासह त्यांच्या येथील (११५) मुलांनी मागील पंचवीस वर्षात तब्बल १५ हजारांपेक्षा जास्त झाडे लावले आहेत.

ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाब पापळकर झाडांबद्दल बोलताना

'अनाथ मुलाचे स्वीकारले पालकत्व'

बेवारस, अनाथ, मूकबधीर, अंध,अपंग या मुलांचे पालकत्व शंकरबाब यांनी स्वीकारलेले आहे. पापळकर हे परतवाडा नजीकच्या वझ्झर येथील स्वर्गीय अंबादासपंत वैद्य मतिमंद बालगृहात राहतात. पूर्वी पत्रकार असलेल्या शंकरबाबा पापळकर यांनी नंतर बेवारस, अनाथ, मूकबधिर, अंध,अपंग अशा मुलांसाठी काम करायला सुरवात केली. सुरवातीला १९९५ च्या दरम्यान चार बेवारस मुले शंकर बाबांनी दत्तक घेतले. तेव्हा, आधी चार झाडे लावले होते. कालांतराने शंकरबाबांकडे या मुलांची संख्या वाढत गेली. आता जवळपास मूल-मुली मिळून (११५) बेवारस, अनाथ मुलाचं पालकत्व शंकर बाबांनी स्वीकारले आहे.

'आश्रमाचा विस्तीर्ण'

शंकर बाबांच्या आश्रमाचा परिसर हा विस्तीर्ण असा आहे. त्यामुळे येथे त्यांची मूल दरवर्षी झाडे लावण्याचे काम करतात. तसेच, फक्त झाड लावण्याचे काम न करता ते रोजच्या रोज या झाडांची काळजीही घेतात. आज जवळपास या आश्रमात १५ हजारापेक्षा जास्त झाडे आहेत. या झाडाच्या माध्यमातून माझे आणि माझ्या लेकरांचे आरोग्य हे चांगले राहत असल्याचे शंकर बाबा सांगतात. सकाळी पहाटेपासून हे मूल झाडांना पाणी देण्याचे काम करतात. झाडांविषयी या मुलांची आपुलकी कायम असल्याचेही शंकर बाबा सांगतात.

'पाच हजार कडू निंबाचे झाड'

चांगल्या आरोग्यासाठी आणि ऑक्सिजनसाठी कडू निंबाचे झाडे हे बहुगुणी आहेत. हीच बाब हेरून शंकरबाबा यांनी १५ हजार झाडांपैकी पाच हजार झाडे हे फक्त कडू निंबाचे झाडे लावले आहे. त्यातील दीड हजार झाडे हे सहा फुटांच्या आतील आहेत. जणेकरून येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याला नाकाला, डोळयांना त्या झाडांचा स्पर्श होईल. यामुळे त्यांना ऑक्सिजन मिळतो. आमच्या आश्रमातील मुलांना कोरोना झाला नाही, असही शंकरबाबा पापळकर यांनी सांगितले आहे.

'या मुलांचा आदर्श घेणं गरजेचे'

शंकरबाबा पापळकर सांगतात, लोक झाडे लावतात. परंतु अनेकजण केवळ फोटोसाठी झाडे लावतात. दुसऱ्या दिवशी ते झाडाकडे पाहतही नाहीत. परंतु, आमच्या मूकबधीर बेवारस अनाथ मुलांनी मात्र किमया केली आहे. तब्बल त्यांनी पंधरा हजार झाडे लावलेली आहेत. त्यांचे झाडाविषयीचे प्रेम आहे. झाडाला एखादे फुल आले की ही मुल ती फुल घेऊन येतात आणि आनंदाने सांगतात की माझ्या झाडाला एक फुल आलं. हे मोठ समाधान आहे असही पापळकर यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.