ETV Bharat / state

लाॅकडाऊनच्या काळात निलंगा तालुक्यातील ३९ गावांना पाणीटंचाईच्या झळा

author img

By

Published : May 7, 2020, 3:12 PM IST

ग्रामीण भागात कोरोना आजारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना त्यात ऐन मे महिन्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. यामुळे, नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी तारांबळ उडाली आहे. अनेक गावात एक दोन ठिकाणी पाणी सोडले जात असल्याने त्या ठिकाणी पाणी घेऊन जाण्यासाठी नागरिकांची मोठी रांग लागून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.

लाॅकडाऊनच्या काळात निलंगा तालुक्यातील ३९ गावांना पाणीटंचाईच्या झळा
लाॅकडाऊनच्या काळात निलंगा तालुक्यातील ३९ गावांना पाणीटंचाईच्या झळा

लातूर - कोरोना संसर्गामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असताना निलंगा तालुक्यातील ३९ गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. आत्तापर्यंत प्रशासनाने १३ गावात २८ बोअरचे अधिग्रहण करुन पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे.

गेल्या दीड महिन्यापासून कोरोनामुळे नागरिक घरातच लॉकडाऊन झाले आहेत. जीवनावश्यक कामाशिवाय घराबाहेर जाताना कोणीच दिसत नाही. ग्रामीण भागात कोरोना आजारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना त्यात ऐन मे महिन्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. यामुळे, नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी तारांबळ उडाली आहे. अनेक गावात एक दोन ठिकाणी पाणी सोडले जात असल्याने त्या ठिकाणी पाणी घेऊन जाण्यासाठी नागरिकांची मोठी रांग लागून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.

तालुक्यातील पाणीटंचाई पाहता गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी निलंगा पंचायत समितीमध्ये पाणीटंचाई निवारण कक्षाची स्थापना केली आहे. यामध्ये कक्षप्रमुख म्हणून प्रकाश कदम, सहाय्यक म्हणून दत्तात्रय खटके व मुरली शिंदे यांची नियुक्ती केली आहे. आजरोजी निलंगा तालुक्यातील ३९ गावामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तर, त्यातील शिराढोन, हलगरा, दापका, गौर, शेडोळ, हंद्राळ, पानचिंचोली, निटुर, हणमंतवाडी(अं.बु), शिऊर, माचरटवाडी, वाडीशेडोळ, आनंदवाडी (अं.बु) या १३ गावात २८ बोअरचे अधिग्रहण करुन पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच, १४ गावांचे प्रस्ताव मंजुरीसाठी व १२ गावांचे प्रस्ताव क्षेत्रीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे दत्तात्रय खटके यांनी सांगितले. मे महिन्यातील उन्हाचा तडाखा पाहता येणाऱ्या काळात अनेक गावात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.