ETV Bharat / state

विदर्भाची पंढरी कौंडण्यपुरात हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने पार पडला दहीहंडी सोहळा

विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडण्यपुरात बुधवारी कार्तिकी एकादशीनिमित्त भव्य अशा दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी विदर्भाच्या पंढरीत दाखल झाले होते.

कौंडण्यपुरात हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने पार पडला दहीहंडी सोहळा
author img

By

Published : Nov 13, 2019, 10:04 PM IST

Updated : Nov 13, 2019, 10:26 PM IST

अमरावती - विदर्भाची पंढरी असलेल्या कौंडण्यपुरात बुधवारी कार्तिकी एकादशीनिमित्त भव्य असा दहीहंडी सोहळा हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित सायंकाळी पार पडला. या दहीहंडी सोहळ्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी विदर्भाच्या पंढरीत दाखल झाले होते. यावेळी खासदार नवनीत राणा यांनीही या सोहळ्यानिमित्त येथे हजेरी लावली होती.

कौंडण्यपुरात हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने पार पडला दहीहंडी सोहळा

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे भीमक राजाची राजधानी तसेच रुख्मिणीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. विदर्भाची पंढरी म्हणूनही या तीर्थक्षेत्राची ओळख आहे. याच कौंडण्यपुरातून विठ्ठलाने रुक्मिणीचे हरण केले होते. दरवर्षी पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी जात असतात. परंतु अनेक वारकऱ्यांना पंढरपूरला जाणे शक्य नसल्याने ते वारकरी कार्तिकी एकादशीला कौंडण्यपूरला येत असतात.

हेही वाचा - पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये अमरावतीतून झेपावणार पहिले विमान; खासदार नवनीत राणांनी केली विमानतळाच्या कामाची पाहणी

वर्धा नदीच्या काठी वसलेल्या या तीर्थक्षेत्राला पुरातन असा वारसा लाभला आहे. त्याच पार्श्वभूमीवर हजारो वारकरी मंगळवारी येथे दाखल झाले होते. तसेच बुधवारी सकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा येथे पार पडली. त्यानंतर दुपारी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी रिंगण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला तर, सायंकाळी साडेपाच वाजता दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, जगतगुरु राजेश्वर महाराज सह आदी उपस्थित होते.

हेही वाचा - मुलाच्या लग्नानिमित्त दिली संपूर्ण गावाला मायेची ऊब; गावकऱ्यांशी जपले ऋणानुबंध

Intro:हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने पार पडला विदर्भाची पंढरी कौंडण्यपुरात दहीहंडी सोहळा.
----------------------------------------------
अमरावती अँकर

विदर्भाची पंढरी असलेल्या कौंडण्यपूरात आज कार्तिकी  एकादशी निमित्त भव्य असा दहीहंडी सोहळा हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित सायंकाळी पार पडला. या दहीहंडी सोहळ्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी विदर्भाच्या पंढरीत दाखल झाले होते .या दहीहंडी सोहळ्याला खासदार नवनीत राणा यांनीही हजेरी लावली होती .

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपुर हे रुक्मिणीचे माहेर घर आहे .विदर्भाची पंढरी म्हणून या तीर्थ क्षेत्राची ओळख आहे. याच कौंडण्यपुरातून विठ्ठलाने रुक्मिणीचे हरण केले होते.दरवर्षी पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी जात असतात.परन्तु अनेक वारकऱ्यांना पंढरपूर ला जाणे शक्य नसते.ते वारकरी कौंडण्यपुरला कार्तिकी एकादशीला येत असतात.

वर्धा नदीच्या काठी वसलेल्या या तीर्थक्षेत्राला पुरातन वारसा लाभला आहे.त्याच पार्श्वभूमीवर हजारो वारकरी मंगळवारी येथे दाखल झाले होते .आज सकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. त्यानंतर दुपारी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी रिंगण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला .तर सायंकाळी साडेपाच वाजता दहीहंडीचा सोहळा पार पडला या सोहळ्याला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ,जगतगुरु राजेश्वर महाराज सह आदी उपस्थित होते..

बाईट-नवनीत राणा खासदार अमरावती
बाईट- ज्ञानेश्वर तायडे वारकरीBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Nov 13, 2019, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.