ETV Bharat / state

121 जणांच्या स्वॅब चाचणी अहवालाची प्रतीक्षा; अमरावतीकरांमध्ये धास्ती - corona latest news

कोरोनामुळे अमरावतीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल आहे. यानंतर घेण्यात आलेल्या 121 जणांचा कोरोना चाचणीचा आवाहल प्रतीक्षेत आहे.

Waiting for a swab test report of 121 people
121 जणांच्या स्वॅब चाचणी अहवालाची प्रतीक्षा; अमरावतीकरांमध्ये धास्ती
author img

By

Published : Apr 6, 2020, 8:37 PM IST

अमरावती - कोरोनामुळे अमरावतीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकणात संभावीत कोरोना रुग्णाची अधिकृत संख्या ही 121 असल्याने अमरावतीकरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.

आजघडीला अमरावती जिल्ह्यातील 3 हजार 778 नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. या सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. 226 जणांचे स्वॅब तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात आले होते. त्यापैकी 93 स्वॅब चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत . 121 स्वॅब चाचण्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. विशेष म्हणजे दोन दिवसांपासून एकही चाचणी अहवाल आला नसल्याने काळजी अधिक वाढली आहे.

121 जणांच्या स्वॅब चाचणी अहवालाची प्रतीक्षा; अमरावतीकरांमध्ये धास्ती

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात 2 एप्रिलला एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू कोरोनाने झाल्याचा अहवाल 4 मार्चला पहाटे मिळाला होता. वाशीम येथे आढळून आलेला कोरोना रुग्ण बडनेरा येथील तीन मशिदीत काही दिवस राहून गेल्याने त्याच्यामुळे कोणी संक्रमित तर झाले नसावे अशीही भिती कायम आहे.

121 संभावित कोरोना रुग्णांपैकी अती संवेदनशील व्यक्तींना कोविड रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर संभाव्य रुग्णांना वालगाव येथील विलगिकरण कक्ष आणि कारागृहालगतच्या मुलींच्या वसतिगृहात ठेवण्यात आले असून चार डॉक्टरांना प्रबोधनीमध्ये ठेवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.