ETV Bharat / state

'त्या' क्लिपवरुन राजकारण तापले; शेखावत म्हणतात 'ती' खोटी, सुर्यवंशी म्हणतात तो माझाच आवाज - भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सुर्यवंशी

या प्रकाराबाबत आज सर्वात आधी रावसाहेब शेखावत यांनी खुलासा करत ही ऑडिओ क्लिप खोटी आहे असा दावा केला.

क्लिपवरुन राजकारण तापले
author img

By

Published : Apr 24, 2019, 8:17 PM IST

अमरावती - काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सुर्यवंशी यांच्यात भ्रमणध्वनीवर झालेल्या संवादाची क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ही क्लिप खोटी असून यात माझा आवाज नाही असा दावा रावसाहेब शेखावतांनी केला असताना प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी क्लिपमध्ये माझाच आवाज आहे. माझ्या जवळच्या मित्रांसोबत मी तिवसा विधानसभा मतदारसंघातून माझ्या निवडणुकीच्या तयारीबाबत अनेकदा बोलतो आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये माझाच आवाज आहे, मात्र पुढून कोण व्यक्ती बोलत आहे हे मला माहिती नाही, असा खुलासा प्रा. सुर्यवंशी यांनी केला आहे.

'त्या' क्लिपवरुन राजकारण तापले

लोकसभा निवडणुकीची धुमाकूळ संपताच रावसाहेब शेखावत आणि दिनेश सुर्यवंशी यांच्यात तिवसा येथील काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, सुर्यवंशी यांना तिवसा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी ५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तशी तयारी आहे का आशा आशयाचा संवाद रावसाहेब आणि दिनेश सुर्यवंशी यांच्यात होतो असे या क्लिपमध्ये स्पष्ट होत आहे. याबाबत ' ईटीव्ही भारत'ने सर्वात आधी वृत्त दिले. 'ईटीव्ही भारत'च्या वृत्तामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान आज सर्वच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरही या दोन्ही नेत्यांमधला संवाद व्हायरल झाला आहे.

या प्रकाराबाबत आज सर्वात आधी रावसाहेब शेखावत यांनी खुलासा करत ही ऑडिओ क्लिप खोटी आहे असा दावा केला. लोकसभा निवडणुकीत महाआघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली. नवनीत राणा यांना अमरावतीतून प्रचंड मत मिळतील असे वातावरण असताना माझ्याबाबत असा मुद्दाम खोडसाळपणा करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. माझा तो आवाज कोणीतरी काढला तो अस्पष्ट ऐकू येत आहे. अमरावतीत हेमामालिनी, शत्रूघन सिन्हा यांचा हुबेहूब आवाज काढणारे आहेत. माझाही असाच आवाज काढून मला बदनाम करण्याचे हे कारस्थान आहे. मी माझे कुटुंब काँग्रेसच्या विचाराचे आहे. माझी बदनामी करण्यासाठी भाजप नेत्यांनी हा कट रचला असल्याचा आरोपही रावसाहेब शेखावत यांनी केला आहे.

ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर दिनेश सुर्यवंशी यांनी रावसाहेब शेखावत यांच्याशी फोनवर या विषयासंदर्भात अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेखवतांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

या प्रकरणाबाबत प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी मी तिवसा मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी करत आहे. त्यामुळे व्यापारी, शिक्षक, राजकारणी अशा विविध क्षेत्रातील अनेक मित्रांसोबत भ्रमणध्वनीवर सातत्याने चर्चा करतो. आता जी काही क्लिप व्हायरल झाली त्यात माझाच आवाज आहे. या क्लिपमध्ये जो दुसऱ्या व्यक्तीचा आवाज येतो तो नेमका कुणाचा आहे हे मला माहिती नाही. विशेष म्हणजे या ऑडिओ क्लिपमध्ये ५ कोटी रुपयांचा जो उल्लेख आहे तो पुढच्या व्यक्तीकडून होत आहे. मात्र सध्या ५ कोटी रुपयांचा विषय माझ्याच तोंडी घालण्याचा प्रकार होत आहे याचे दुःख वाटते, असे सुर्यवंशी म्हणाले. आज या संदर्भात पत्रकारांना स्पष्टीकरण देण्यापूर्वी माझे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसोबत बोलणे झाले आहे. माझी बाजू मी वरिष्ठांकडे स्पष्ट केली असल्याचेही प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

रावसाहेब शेखावत आणि प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी या प्रकरणात आपापली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी ही क्लिप व्हायरल कशी झाली. या क्लिपबाबत नेमकं खरं आणि खोटं काय हे स्पष्ट होऊ शकले नसल्याने येणाऱ्या काळात या क्लिपला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.

Intro:काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा.दिनेश सुर्यवंशी यांच्यात भ्रमणध्वनीवर झालेल्या संवादाची क्लिप वायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. ही क्लिप खोटी असून यात माझा आवाज नाही असा दावा रावसाहेब शेखावंतांनी केला असताना प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी क्लिपमध्ये माझाच आवाज आहे. माझ्या जवळच्या मित्रांसोबत मी तिवसा विधानसभा मतदार संघातून माझ्या निवडणुकीच्या तयारीबाबत अनेकदा बोलतो . या ऑडिओ क्लिपमध्ये माझाच आवाज आहे मात्र पुढून कोण व्यक्ती बोलत आहे हे मला माहिती नाही असा आश्चर्यकारक खुलासा प्रा. सुर्यवंशी यांनी केला आहे.

Body:लोकसभा निवडणुकीची धुमाकूळ संपताच रावसाहेब शेखावत आणि दिनेश सुर्यवंशी यांच्यात तीवसा येथील काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, सुर्यवंशी यांना तिवसा मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी ५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे तशी तयारी आहे का आशा आशयाचा संवाद रावसाहेब आणि दिनेश सुर्यवंशी यांच्यात होतो आहे असे या क्लीप मध्ये स्पष्ट होते आहे. याबाबत ' ईटीव्ही भारत'ने सर्वात आधी वृत्त दिले. 'ईटीव्ही भारता' वृत्तामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान आज सर्वच व्हाट्सअप्प ग्रुपवर ही या दोन्ही मेत्यांमधला संवाद वायरल झाला आहे.
या प्रकारबाबत आज सर्वात आधी रावसाहेब शेखावत यांनी खुलासा करीत ही ऑडिओ क्लिप खोटी आहे असा दावा केला. लोकसभा निवडणुकीत महाआघाडीच्या उमेद्वार नवनीत राणा यांच्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली. नावनीत राणा यांना अमरावतीतून प्रचंड मत मिळाळतील असे वातावरण असताना माझ्याबाबत असा मुद्दाम खोडसाळपणा करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. माझा जो आवाज कोणीतरी काढला तो अस्पष्ट ऐकू येत आहे. अमरावतीत हेमामालिनी, शत्रूघन सिन्हा यांचा हुबेहूब आवाज काढणारे आहेत.माझाही असाच आवाज काढून मला बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे. मी,माझे कुटुंब काँग्रेसच्या विचाराचे आहे. माझी बदनामी करण्यासाठी भाजप नेत्यांनी हा कट रचला असल्याचा आरोपही रावसाहेब शेखावत यांनी केला आहे.
दरम्यान ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर दिनेश सुर्यवंशी यांनी रावसाहेब शेखावत यांच्याशी भ्रमणध्वनिवर या विष्यासमदर्भात अनेकदा सम्पर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र शेखवतांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
या प्रकरणाबाबत प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी मी तिवसा मतदार संघात निवडणूक लढण्याची तयारी करतो आहे.त्यामुळे व्यापारी, शिक्षक, राजकारणी, अशा विविध क्षेत्रातील अनेक मित्रांसोबत भ्रमणध्वनीवर सातत्याने चर्चा करतो आहे. आता जी काही क्लिप व्हायरल झाली त्यात माझाच आवाज आहे. या क्लिपमध्ये जो दुसऱ्या व्यक्तीचा आवाज येतो आहे तो नेमका किनाचा आहे हे मला माहिती नाही. विशेष म्हणजे या ऑडिओ क्लिपमध्ये ५ कोटी रुपयांचा जो उल्लेख आहे तो पुढच्या व्यक्तीकडून होत आहे. मात्र सध्या ५ कोटी रुपययांचा विषय माझ्याच तोंडी घालण्याचा प्रकार होत आहे याचे दुःख वाटते असे सुर्यवंशी म्हणाले. आज या संदर्भात पत्रकारांना स्पष्टीकरण देण्यापूर्वी माझे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यासोबत बोलणे झाले आहे. माझी बाजू मी वरिष्ठांकडे स्पष्ट केली असल्याचेही प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी सोष्ट केले आहे.
दरम्यान रावसाहेब शेखावत आणि प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी या प्रकरणात आपापली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी ही क्लिओ व्हायरल कशी झाली. या क्लिपबाबत नेमकं खरं आणि खोटं काय हे सोष्ट होऊ शकले नसल्याने येणाऱ्या काळात या औडिओ क्लिपला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.