ETV Bharat / state

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये वऱ्हाडी भाषेला मानाचे स्थान मिळवून देणार - श्याम ठक - तिसरे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात तिसऱ्या अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये वऱ्हाडी बोली भाषेला मानाचे स्थान मिळालेले नाही, त्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया श्याम ठक यांनी दिली.

अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन
अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन
author img

By

Published : Jan 5, 2020, 9:43 AM IST

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच अकोला यांनी संयुक्तपणे तिसरे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. वऱ्हाडी या बोली भाषेला मराठी साहित्यामध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया वऱ्हाडी साहित्य मंचांचे श्याम ठक यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन

वऱ्हाडी भाषेची पुणे-मुंबईकर खिल्ली उडवत असल्याचा अनुभव श्याम यांना आला. या प्रकारामुळे व्यथित झालेल्या श्याम यांनी आपल्या अकोल्यातील भाषाप्रेमी सवंगड्यांसोबत मिळून अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाची स्थापना केली. याच मंचाच्या माध्यमातून 2018 मध्ये पहिले अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे आयोजनही केले. यातून हळूहळू वऱ्हाडी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम होत आहे.

हेही वाचा - मराठवाड्यात पहिल्यांदाच नव्हे, तर यापूर्वीही झाले होते साहित्य संमेलन

वऱ्हाडी भाषेत लिखाण करणाऱ्या नवोदित लेखकांना संधी मिळावी. त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये वऱ्हाडी बोली भाषेला मानाचे स्थान मिळालेले नाही. मात्र, येणाऱ्या काळात मराठी साहित्य संमेलनात वऱ्हाडी भाषेला महत्त्व प्राप्त व्हावे यासाठी मंचाच्या वतीने पाठपुरावा केला जाईल, असे श्याम ठक यांनी सांगितले.

विठ्ठल वाघ यांनी वऱ्हाडी भाषेतील लिखाण थांबवल्यानंतर वऱ्हाडी भाषा संपली, असा समज आहे. मात्र, मराठी प्रमाणेच वऱ्हाडी भाषेचे वैभव हे न संपणारे आहे. वऱ्हाडी भाषेच्या समृद्धीसाठी एक शब्दकोशही तयार करण्यात आला आहे. परदेशात असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला वऱ्हाडी भाषा याद्वारे सहज कळू शकते. वऱ्हाडी बोलीभाषेतील पोर्टल सुरू करण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती श्याम ठक यांनी दिली.

Intro:एका व्हाट्सअप ग्रुपवर वऱ्हाडी बोली भाषेतील कविता पोस्ट केल्यावर ग्रुपवर असणाऱ्या पुण्या-मुंबईतील सदस्यांकडून ही कसली भाषा म्हणून खिल्ली उडवण्यात आली. आणि इथूनच आपल्या भाषेला विशेष असा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी सुरु झालेली श्याम ठक यांची धडपड वऱ्हाडी भाषेला व्हाट्सअप ग्रुप वरून थेट साहित्य संमेलनापर्यंत घेऊन आली.

Body:संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच अकोला यांच्या संयुक्त वतीने आज विद्यापीठाच्या मराठी विभागात तिसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलण्याची वेगळी तऱ्हा आणि गोडी असणारी वऱ्हाडी भाषा समृद्ध करण्यासाठी झपाटलेले श्याम ठक यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना वऱ्हाडी भाषा समृद्धीसाठी सुरू असणाऱ्या प्रयत्नांतबाबत दिलखुलास संवाद साधला.
आपल्या वऱ्हाडी भाषेची पुणे-मुंबईकर खिल्ली उडवतात हे जरा खटकणारे होते. आपली भाषा ही सुद्धा सन्मानाची भाषा आहे. यासाठी आपल्या अकोलेकर भाषाप्रेमी सवंगड्यांसोबत मिळून श्याम ठक यांनी अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाची स्थापना केली. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचच्या वतीने 2018 साली पहिले अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी तिसरे अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित करण्यात आले आहे. श्याम ठक म्हणतात विठ्ठल वाघ यांनी वऱ्हाडी भाषेतील लिखाण थांबविल्या नंतर वऱ्हाडी भाषा संपली असा ठपका आमच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र आमच्या बोलीचे वैभव हे संपणारे नाही. आमची भाषा ही बळकट आहे. वऱ्हाडी भाषेच्या समृद्धीसाठी आम्ही मराठी भाषेचा कोषही तयार केला आहे. इंग्लंड,अमेरिका, ऑस्ट्रेलिया असे परदेशात असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला वऱ्हाडी भाषेतला अर्थ या कोषाद्वारे सहज कळू शकतो. वऱ्हाडी बोलीभाषेतील पोर्टलही आम्ही सुरू करतो आहोत.
वऱ्हाडी भाषेत लिखाण करणाऱ्या नवोदित लेखकांना संधी मिळावी. त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात वऱ्हाडी बोलीभाषेला हवे तसे स्थान अद्यापही मिळाले नाही. मात्र येणाऱ्या काळात मराठी साहित्य संमेलनात वऱ्हाडी भाषेला महत्त्व प्राप्त व्हावे यासाठी आमच्यावतीने पाठपुरावा केला जाईल असे श्याम ठक म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.