अमरावती - मागील अनेक दिवसांपासून 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केव्हा सुरू होणार? ही चर्चा सुरू होती. परंतु, आता राज्य सरकारच्या निर्णयानंतर आजपासून (1 मे) राज्यातील अनेक जिल्ह्यात 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे.
5 केंद्रावर होणार लसीकरण
अमरावती जिल्ह्यातील 5 लसीकरण केंद्रांवर 18 वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. आज दुपारी 2 वाजल्यापासून हे लसीकरण सुरू झाले. या लसीकरणासाठी जिल्ह्याला फक्त साडेसात हजार लसीचे डोस मिळाले आहेत.
लसीचा तुटवडा निर्माण होणार?
अमरावतीत 18 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. त्यासाठी साडेसात हजार डोस मिळाले आहेत. मात्र, लवकरच लसीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसातच ही लस संपण्याची भीती सुद्धा वर्तवली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अनेकवेळा मोठ्या प्रमाणावर लसीचा तुटवडा पाहायला मिळाला आहे. त्यामुळे अनेकदा जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे पूर्णतः बंद करण्याची नामुष्की आरोग्य विभागवर आली होती.
दरम्यान, आता केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज अमरावतीतही 5 ठिकाणी लसीकरण सुरू झाले.
हेही वाचा - राजवाडीत 14 ते 44 वयोगटातील 200 लाभार्थ्यांचे प्रतिकात्मक लसीकरण
हेही वाचा - सीबीआयकडून चौकशीचा अहवाल विशेष न्यायालयात सादर