ETV Bharat / state

अमरावतीचे अप्पर वर्धा धरण लवकरच पुर्णक्षमतेने भरणार;  88 टक्के जलसाठा - सातपुडा पर्वत रांगा

बुधवारी मोर्शी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नळदमयंती नदीला महापूर  आला आहे. यामुळे 24 तासात अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात 10 टक्क्यांनी वाढ झाली. यामुळे 78 टक्यांवर असलेला अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा हा आज 88 टक्यांवर पोहोचला आहे.

अप्पर वर्धा धरण
author img

By

Published : Sep 5, 2019, 2:15 PM IST

अमरावती - मागील आठ दिवसापासून मध्य प्रदेश व सातपुडा पर्वत रांगेत चांगला पाऊस होत आहे. यामुळे तब्बल तीन वर्षानंतर अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज गुरुवारी सकाळी पाच वाजेपर्यंत धरणात एकूण 88 टक्के जलसाठा जमा झाला आहे.

अप्पर वर्धा धरण

बुधवारी मोर्शी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नळदमयंती नदीला महापूर आला आहे. यामुळे 24 तासात अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात 10 टक्क्यांनी वाढ झाली. यामुळे 78 टक्यांवर असलेला अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा हा आज 88 टक्यांवर पोहोचला असून पाऊस असाच सुरू राहल्यास एक दोन दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - आमच ठरलंय... शिवसेना- भाजपचा प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री - रामदास कदम

मागील वर्षी अपुऱ्या पावसामुळे पावसाळ्याच्या शेवटी अप्पर वर्धा धरनाचा जलसाठा हा 52 टक्क्याचा आकड्यावर थांबला होता. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात धरणाचा जलसाठा हा 11 टक्क्यांपर्यंत घसरला होता. दरम्यान, यावर्षी जून - जुलै महिन्यात धरणातील पाण्याची पातळी फार वाढू शकली नसली, तरी ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाल्याने जलसाठा वाढला आहे. यामुळे अमरावती शहरासह वरुड ,मोर्शी आणि इतर परिसरातील पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतीच्या सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघाली आहे.

हेही वाचा - ऐन गणेशोत्सवातच राज्यातील शेतकरी, कामगार, शिक्षक रस्त्यावर.. फडणवीस सरकारची कसोटी

Intro:अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाची 100 टक्यांकडे वाटचाल,धरनात 88 टक्के जलसाठा.

24 तासात 10 टक्यांनी वाढला जलसाठा.
-----------------------------------------------
अमरावती अँकर

मागील आठ दिवसा पासून मध्य प्रदेश व सातपुडा पर्वत रांगेत चांगला पाऊस होत असल्याने तबल तीन वर्षां नंतर अप्पर वर्धा धरनाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. आज गुरुवारी सकाळी पाच वाजेपर्यंत धरणात 88 टक्के जलसाठा जमा झाला.काल मोर्शी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने नळदमयंती नदीला महापूर आल्याने 24 तासात 10 टक्यांनी धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. काल 78 टक्यांवर असलेला अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा हा आज 88 टक्यांवर पोहचला असून पाऊस असाच सुरू राहल्यास एक दोन दिवसातच 100 धरण भरण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी अपुऱ्या पावसामुळे पावसाळ्याच्या शेवटी अप्पर वर्धा धरनाचा जलसाठा हा 52 टक्यांच्या वर पोहचू शकला नव्हता .त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात धरणाचा जलसाठा हा 11 टक्क्यांपर्यंत घसरला होता.दरम्यान यावर्षी जून जुलै महिन्यात धरणातील पाण्याची पातळी फार वाढू शकली नसली तरी ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाल्याने जलसाठा वाढला असल्याने अमरावती शहरास ,वरुड ,मोर्शी, सह इतर परिसरातील पाण्याचा प्रश मिटला असून शेतीच्या सिंचनासाठी साठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघाली आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.