ETV Bharat / state

अनधिकृत देशी दारूच्या दुकानावर महापालिकेची कारवाई - Deshi liquor shop demolished

Deshi Liquor Shop Demolished : अमरावती शहरात अनधिकृत देशी दारूचे दुकान आमदार रवी राणा यांच्या पुढाकारामुळं तोडण्यात आलं आहे. या दुकानाला नागरिकांनी विरोध केला होता, मात्र तरीदेखील देशी दारूचं दुकाना या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलं होतं.

Unauthorized Deshi liquor shop demolished
दारूच्या दुकानावर महापालिकेची कारवाई
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 10:54 PM IST

आमदार रवी राणा

अमरावती Deshi Liquor Shop Demolished : अमरावती शहरातील यशोदा नगर ते दासपूर्णकर या जुन्या बायपासवर अनधिकृत देशी दारूचे दुकान थाटण्यात आलं होतं. या दुकानाला अनेक दिवसांपासून विरोध होता. विशेषत: हे दुकान सुरू होऊ नये, यासाठी गेल्या काही दिवसांपासून नागरिक आंदोलन करत होते. असं असताना रविवारी या दुकानाचं उद्घाटन होणार होतं. मात्र, त्याआधिच अमरावती महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं शनिवारी सायंकाळी हे दुकान जमीनदोस्त केलंय.

देशी दारूचे दुकान तोडलं : अतिक्रमणामुळं देशी दारूचे दुकान तोडण्यात आलं असताना या देशी दारूचा परवाना वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील आहे. मात्र, 'हे' दुकान अमरावती येथे हलविण्यात आलं होतं. आनंद जयस्वाल नावाच्या व्यक्तीनं जुन्या महामार्गावर अतिक्रमण करून 'हे' दुकान थाटलं होतं. विशेष म्हणजे या देशी दारूच्या दुकानामागे त्याचं रेस्टॉरंट आणि बारही कार्यरत आहेत. याठिकाणी हे दुकान होऊ नये म्हणून परिसरातील नागरिकांनी महिनाभरापासून आंदोलन केलं होतं, मात्र प्रशासनानं नागरिकांच्या विरोधाची योग्य दखल घेतली नव्हती.

आमदार रवी राणांच्या पुढाकारानं कारवाई : 'या' अनधिकृत देशी दारूच्या दुकानाजवळ आदिवासी मुलांचं वसतिगृह आहे. तसंच विविध रुग्णालये, जिल्ह्यातील सर्वात मोठे नेत्र रुग्णालय देखील आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी आमदार रवी राणा यांनी पालिका प्रशासनाला दुकानावर कारवाई करण्याचे आदेश दिले. सायंकाळी सहाच्या सुमारास यशोदा नगरजवळील अनेक शहरी भागातील नागरिकांनी या अनधिकृत देशी दारूच्या दुकानासमोर गर्दी केली होती. त्यावेळी, महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं बुलडोझरच्या सहाय्यानं दुकान जमीनदोस्त केलं. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा -

  1. लोकसभेत गद्दारांच्या घराणेशाहीला गाडा; ठाकरेंचा खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा
  2. 'लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचं उद्घाटन'
  3. 'या' कारणामुळे चीनशी संबंध सामान्य होणं अशक्य, सीमा प्रश्नावर जयशंकर यांची भूमिका काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.