ETV Bharat / state

अमरावतीत दुचाकी आणि गाडीची झाली धडक; दोन ठार तर एक जखमी - Two-wheeler and vehicle collided in Amravati;

अमरावतीतील सावली दातुरा गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी दुचाकी आणि गाडीची धडक झाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. अकोला परतवाडा महामार्गावर झालेल्या अपघातात पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

crucial accident
crucial accident
author img

By

Published : Jun 12, 2021, 2:17 PM IST

अमरावती - सावली दातुरा गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी दुचाकी आणि गाडीची धडक झाल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. अकोला परतवाडा महामार्गावर झालेल्या अपघातात पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अब्दुल जलील अब्दुल रशीद (वय 45) अब्दुल गफ्फार शेख हुसैम ( वय.50) हे दोघेही दर्यादाजचे रहिवासी असून त्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. सावली दातूरा येथील बुलढाणा अर्बन गोडाऊनजवळील पुलावर हा अपघात झाला.

दुचाकी आणि गाड्यांची धडक

दर्याबाद येथील रहिवासी दुचाकी चालक जलील खान परतवाड्यातून मोटारसायकलवरून येत होता. त्याचवेळी झेन ड्रायव्हर पुरी वेगात होता आणि त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका गंभीर होता की मोटारसायकल गाडीच्या खाली दबली. त्यातच कार चालक निलेश दुरगुडे जखमी झाले, तर दुचाकीस्वाराचा आणि त्याच्या पाठी बसलेल्या सहकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर गाडीला अचानक आग लागली होती. ग्रामस्थांनी कार विझवून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात नेले.

स्पीड ब्रेकर लावण्याची नागरिकांची मागणी

अंजनगाव रोडवर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वारंवार असे अपघात होत आहेत. ज्यामध्ये निष्पाप लोक आपला जीव गमावत आहेत. परतवाडा अंजनगाव रोडवर त्वरित स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. त्याचबरोबर हा महामार्ग काँक्रीटने पाडण्याच्या मागणीला वेग आला आहे.

हेही वाचा -राज पांडे खून प्रकरण; काकासोबत असलेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी पुतण्याचा खून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.