ETV Bharat / state

Land Selling Fraud Case: दोन पुतण्यांनी केली काकांसह सहा जणांची फसवणूक; धामणगाव रेल्वे येथील प्रकार - बोगस पावर ऑफ ॲटर्नी

बोगस पावर ऑफ ॲटर्नी समोर करून दोन पुतण्यांनी काकांसह सहा जणांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी तक्रारदार सुभाष रुईकर यांची आरोपी किशोर रुईकर आणि घनश्याम रुईकर यांनी फसवणूक केली असल्याची माहिती दत्तापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत ठाकरे यांनी दिली आहे. (Bogus power of attorney) (Land sale fraud) (Nephew cheats uncle) (Land sale On bogus document) (Land Selling Fraud Case)

Land Selling Fraud Case
फसवणूक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 10:48 PM IST

अमरावती: धामणगाव रेल्वे तालुक्यातील 14 हेक्टर शेती पैकी काही शेती दोन पुतण्यांनी गत आठ वर्षांत थोडी थोडी करून विकून टाकली. हा गंभीर प्रकार आता नऊ वर्षानंतर लक्षात आल्यावर काकांनी दत्तापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी घनश्याम यादवराव रुईकर आणि यवतमाळ जिल्ह्यातील नांजा येथील रहिवासी किशोर यादवराव रुईकर या दोघांविरुद्ध दत्तापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bogus power of attorney) (Land sale fraud) (Nephew cheats uncle) (Land sale On bogus document) (Land Selling Fraud Case)

असा घडला घटनाक्रम: दत्तापूर शेत शिवारात सुभाष रुईकर (62) यांचे आजोबा गणपत प्रल्हाद रुईकर यांच्या मालकीची 14 हेक्टर शेती होती. गणपत रुईकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जमिनीचा वारस म्हणून सुभाष रुईकर यांच्यासह सहा जणांची सात बारावर नोंद करण्यात आली. मात्र सुभाष रुईकर यांचे पुतणे किशोर रुईकर आणि घनश्याम रुईकर यांनी खोट्या मुक्तार पत्राचा वापर करून व खोटे घोषणापत्र सादर करून या शेतजमिनी पैकी काही जमीन ही 6 जानेवारी 2014 ते 26 ऑगस्ट 2022 दरम्यान थोडी थोडी करून परस्पर विकली. धामणगाव रेल्वे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात या जमीन विक्री व्यवहाराची नोंद देखील करण्यात आली. पुतण्यांनी परस्पर केलेल्या या कारभाराची माहिती सुभाष रुईकर यांना झाल्यावर त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय गाठले. तेथे संपूर्ण प्रकाराची माहिती घेतल्यावर दत्तापूर पोलीस ठाण्यात पुतण्यां विरोधात तक्रार दिली.

रद्द झालेल्या मुक्तारपत्राचा वापर: या संपूर्ण प्रकरणात दत्तापूर पोलीस ठाण्यात सुभाष रुईकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी किशोर रुईकर आणि घनश्याम रुईकर या दोघांनाही सुभाष रुईकर यांनी मुक्तार पत्र करून दिले होते. मात्र या दोघांच्या नावे मुक्तारपत्र करणे ही आपली चूक असल्याचे लक्षात आल्यावर सुभाष रुईकर यांनी धामणगाव रेल्वे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात ते रद्द करून घेतले होते. असे असताना आरोपींनी त्यांच्याजवळ रद्द करण्यात आलेल्या मुक्त्यारपत्राची दुय्यम प्रत असल्यामुळे त्याचा गैरवापर करून 14 हेक्टर जमिनीपैकी काही शेती विकली. वारसांमधील कही जणांचा मृत्यू झाला असताना खोटी घोषणापत्रे लावून सुभाष रुईकर यांची किशोर रुईकर आणि घनश्याम रुईकर यांनी फसवणूक केली असल्याची माहिती दत्तापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत ठाकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा:

  1. Goa Land Selling Fraud Case : बनावट कागदपत्रांच्या आधारे विकण्यात आलेल्या जमिनींची एसआयटी मार्फत होणार चौकशी - प्रमोद सावंत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.