अमरावती- चांदुर बाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथील नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण बेपत्ता आहेत. आकाश राजेंद्र वानखडे (वय25) ) व संकेत देवानंद गायकवाड (वय 24) अशी बेपत्ता झालेल्या तरूणांची नावे आहेत. सायंकाळी सात वाजेपासून हे दोघे तरुण बेपत्ता आहेत.
दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पुलाखाली मोठ्या प्रमाणात खोदकाम झाल्याने त्यांना शोधण्यात अडचण येत असल्याने 'एनडीआरफ'ला पाचारण करण्यात आले आहे. 'एनडीआरफ'द्वारा शोध मोहीम सुरू आहे. गेल्या काही दिवसांत पाण्याचा अंदाज न आल्याने असंख्य जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. पाणी अचानक वाढल्यामुळे अंदाज येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.