ETV Bharat / state

भारतीय रेल्वेतर्फे एका महिन्यात चालवल्या गेल्या दोनशे 'ऑक्सिजन एक्सप्रेस' - ऑक्सिजन एक्सप्रेस बातमी

ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने गेल्या एका महिन्यात २०० ऑक्सिजन एक्सप्रेस चालवल्या आहेत. यातून ७७५ टँकरद्वारे १२ हजार ६३० मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक करण्यात आली आहे.

indian Railway Oxygen Express news
भारतीय रेल्वेतर्फे एका महिन्यात चालवल्या गेल्या दोनशे 'ऑक्सिजन एक्सप्रेस'
author img

By

Published : May 20, 2021, 7:24 PM IST

मुंबई - देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. यातील अनेक कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याने देशभरात ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे. मात्र, ऑक्सिजनची टंचाई दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने गेल्या एका महिन्यात २०० ऑक्सिजन एक्सप्रेस चालवल्या आहेत. यातून ७७५ टँकरद्वारे १२ हजार ६३० मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक करण्यात आली आहे.

१२ हजार मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजनची वाहतूक -

महामारीच्या काळात भारतीय रेल्वेद्वारे अत्यावश्यक सेवांचा पुरवठा केला जात आहे. तसेच आता ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे ऑक्सिजनचा पुरवठादेखील राज्याच्या मागणीनुसार केला जात आहे. याकरिता देशभरात एकूण २०० ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविण्यात आल्या आहेत. यामधून एकूण १२ हजार ६३० मेट्रीक टन एलएमओची वाहतूक केली आहे. याद्वारे महाराष्ट्रात ५२१ मेट्रीक टन, उत्तर प्रदेशमध्ये ३ हजार १८९ मेट्रीक टन, मध्य प्रदेशमध्ये ५२१ मेट्रीक टन, हरियाणामध्ये १ हजार ५४९ मेट्रीक टन, तेलंगणात ७७२ मेट्रीक टन, राजस्थानात ९८ मेट्रीक टन, कर्नाटकात ६४१ मेट्रीक टन, उत्तराखंडमध्ये ३२० मेट्रीक टन, तामिळनाडूमध्ये ५८४ मेट्रीक टन, आंध्र प्रदेशमध्ये २९२ मेट्रीक टन, पंजाबमध्ये १११ मेट्रीक टन, केरळमध्ये ११८ मेट्रीक टन आणि दिल्लीमध्ये ३ हजार ९१५ मेट्रीक टनांपेक्षा अधिक ऑक्सिजन पोहोचवण्यात आले आहे.

चक्रीवादळातही धावली 'ऑक्सिजन एक्सप्रेस' -

तौक्ते चक्रीवादळाचे संकट समोर असताना कोरोना रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी पश्चिम रेल्वेने दोन ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवून रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. मागील दोन दिवस गुजरातसह किनारपट्टीच्या भागात तौत्के चक्रीवादळाचे संकट होते. मात्र, या संकटात ऑक्सिजन एक्स्प्रेसची वाहतूक सुरू ठेवून ऑक्सिजन दिल्लीत पोहचविण्यात आले. मंगळवारी राजकोट विभागातील कानालूसमधील रिलायंस रेल साइडिंगहून दिल्लीमधील ओखला येथे पाच द्रवरूप ऑक्सिजनचे टॅंकर आणि आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे चार ऑक्सिजन टॅंकर नेण्यात आले. या ऑक्सिजन एक्स्प्रेसमधून १६८.४३ द्रवरूप ऑक्सिजनची वाहतूक करण्यात आली.

दररोज जवळपास 800 मेट्रीक वाहतूक -

रेल्वेद्वारे गुजरातमधील हापा आणि मुंद्रा, ओरिसामधील ओरिसा रुरकेला आणि अंगुल, पश्चिम बंगालमधील दुर्गापूर, झारखंडमधील टाटानगर याठिकाणांहून ऑक्सिजन आणला जात आहे. त्यानंतर, राज्यांच्या मागणीनुसार प्रत्येक राज्यात ऑक्सिजन पुरविला जात आहे. सध्या देशभरात ऑक्सिजन एक्स्प्रेसकडून दररोज जवळपास 800 मेट्रीक टन द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- भूमिका मांडणार; २७ मे पर्यंत मराठा समाजाने शांत राहावे - संभाजीराजे छत्रपती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.