अमरावती - अमरावती ते अकोला रस्त्यावरील तोंगलाबाद-सौंदळी फाट्याजवळ मंगळवारी (दि. 22 डिसें.) चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.
दर्यापूर शहरातील शिवसेना उपशहर प्रमुख विजय खंडारे हे पत्नी व मुलासह स्वतःच्या चारचाकीतून अमरावतीहून पुण्याला जात होते. त्यावेळी समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. त्यानंतर विजय खंडारे यांना पत्नी व मुलासह अकोला येथील आयकॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विजय खंडारे व त्यांच्या पत्नीला डॉक्टारांनी मृत घोषित केले असून त्यांच्या मुलावर उपचार सुरू आहेत. सामाजिक व राजकीय आणि उद्योग क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या विजय खंडारे यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा - विदर्भात तापमान घसरण्याची शक्यता; अमरावतीचे तापमान १२ अंशावर..
हेही वाचा - पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत उभे राहणार महाराष्ट्रातील शेतकरी; अंबानींच्या कार्यालयावर उद्या मोर्चा